तरुणांसाठी गूड न्यूज! एसटीत लवकरच ‘या’ पदासाठी नोकरभरती करणार, मंत्री सरनाईकांची माहिती

एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

ST Recruitment – तरुणांसाठी एक आनंदासाची बातमी समोर येत आहे. तरुणांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तरी ही बातमी नक्की वाचा, कारण एसटीत आता विविध पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. एसटी अर्थात लालपरी ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाते. त्याच एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत करण्यासाठी भविष्यात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या एसटी बसेसच्या चालविण्यासाठी मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामुळं चालक-वाहक पदासह अन्य काही वर्गातील पदे  सुद्दा एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत.

या नोकरी भरतीबाबत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. दरम्यान, या भरतीच्या ठरावाला संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

प्रस्तावाच्या मंजुरीनंतर भरती…

नव्या बसेस चालवण्यासाठी चालक-वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबत ठरावाला एस टी महामंडळाच्या ३०७ व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला २०२४ पर्यंत मनाई केली होती. मात्र पुढील काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच या भरतीच्या प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात येत आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर भरतीला सुरुवात होईल, असं मंत्री सरनाईक म्हणाले.

अभियंत्यांची देखील पदे भरणार

भविष्यात पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागे बाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे. सध्या एसटीत रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमांतून भरण्यात येणार आहेत. महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी यांची गरज आहे. त्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्याबाबत एकत्रित मागणी सादर करावी, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


About Author

Astha Sutar

Other Latest News