Tech Tips : उन्हाळा आला की तुम्ही एसी-कूलर दुरुस्त करून घेता. बाइक व्यवस्थित चालत नसेल, तर सर्व्हिसिंगसाठी मेकॅनिककडे घेऊन जाता. अगदी त्याचप्रमाणे, तुमच्या फोनलाही वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज असते, जेणेकरून तो सुस्त किंवा स्लो होऊ नये.
फोनमध्ये सतत भरत जाणारी मेमरी काही काळानंतर आपल्या स्मार्टफोनला इतका स्लो करून टाकते, की काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेला नवीन फोनही जुना वाटू लागतो. अशा परिस्थितीत, फोनची दुरुस्ती तुम्हीच घरच्या घरी सहज करू शकता.

स्लो झालेला स्मार्ट फोन पुन्हा सुपरफास्ट कसा करायचा, याबाबत आपण खाली काही घरगुती टीप्स जाणून घेणार आहोत.
स्लो फोन बनता डोकेदुखी
जर तुम्हाला एखादी अत्यावश्यक पेमेंट करायची असेल, कोणाला तरी पटकन कॉल करायचा असतो किंवा मित्रांसोबत पटकन सेल्फी घ्यायची असेल आणि त्या क्षणी ते अॅपच उघडत नसेल तर साहजिकच आपली प्रचंड चिडचिड होते. फोनच्या संथपणामुळे काम उशिरा पूर्ण होते आणि कधी कधी आर्थिक नुकसानही होऊ शकते. अशा वेळी असल्या फोनचा उपयोग तरी काय? असे वाटू लागते.
कामात न येणारे अप्स हटवा
अनेकदा फोन स्लो होण्याचे खरे कारण आपणच असतो. ऑफर्स मिळवण्यासाठी किंवा कॅशबॅकच्या आशेने आपण अनेक अॅप्स डाउनलोड करतो आणि नंतर त्यांना अनइंस्टॉल करायचे विसरतो. हे अॅप्स बॅकग्राउंडमध्ये सतत चालू राहतात आणि तुमच्या फोनचे RAM आणि स्टोरेज दोन्ही व्यापून टाकतात. थोडक्यात, आपणच फोनला स्लो होण्यास भाग पाडतो.
अशा स्थितीत असे अॅप्स फोनमधून काढून टाकून, तुम्ही काही मेमरी आणि रॅम मोकळी करू शकता. जर मेमरीमधील भार कमी झाला तर तुमच्या फोनवरील इतर अॅप्स श्वास घेऊ शकतील आणि सुरळीतपणे काम करू लागतील.
जसे की आपण आधी सांगितले, काही अॅप्स फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सतत चालू असतात आणि त्यामुळे बॅटरीचा जास्त वापर होतो. तुम्ही फोनच्या बॅटरी सेटिंग्समध्ये जाऊन हे अॅप्स पाहू शकता. या अॅप्सची बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटी बंद करून तुम्ही फोनचं परफॉर्मन्स सुधारू शकता.
उदाहरणार्थ– फेसबुक, इंस्टा, यूट्यूब, एक्स (Twitter) यासारखी अॅप्स बॅकग्राउंडमध्ये सर्वाधिक बॅटरी वापरतात. यासाठीची सेटिंग तुम्हाला फोनच्या बॅटरी सेटिंगमध्ये मिळेल.
अवांतर फोटो व्हिडोओ डिलीट करा
स्टोरेजमध्ये गरज नसलेले फोटो आणि व्हिडीओसला डिलीट केल्याने तुमचा डिवाइस जास्त फास्ट होऊ शकतो. व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये रिसिव्ह केलेले फोटो आणि व्हिडीओ पब्लिकली मेमोरी भरून टाकतात, आणि कधी कधी डाउनलोड केलेल्या मुव्हीजला पाहिल्यानंतर आपण त्यांना डिलीट करायला विसरतो. हे सर्व मेमोरीला स्लो करतात, म्हणून हे फाइल्स डिलीट करणे जास्त फायद्याचे ठरेल.
जंक क्लिनरने मेमरी क्लीन करा
जर तुम्हाला जास्त विचार न करता, फक्त एका क्लिकमध्ये समस्या सोडवायची असेल, तर ‘क्लिनर’ रन करणे हा सर्वात सोपा उपाय आहे. तुम्हाला आठवड्यात फक्त दोन ते तीन वेळा क्लिनर रन करावा लागेल. असे केल्याने आपोआप फोनमधून ऑब्सोलिट फाइल्स आणि जंक हटवून रॅम साफ करून टाकते. यासाठी तुम्ही तुमच्या फोनमधील प्री-इन्स्टॉल्ड क्लिनरच वापरा, कारण हे फोन डेटासाठी सुरक्षित असेल.