टिव्हीएस’ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक; नेमकं काय खास? जाणून घ्या सविस्तर

कमी किंमतीत आणि चांगलं मायलेज देणारी बाईक मिळावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. लोकांचं हे स्वप्न आता टीव्हीएस कंपनी सत्यात उतरणावर आहे. कारण, अवघ्या 60 हजारांत चांगलं मायलेज देणारी बाईक लाँच करत आहे.

कमी किंमतीत जास्त मायलेज देणारी बाईक भारतीय ग्राहक नेहमीच शोधत असतात. आता ग्राहकांचा हा शोध थांबेल. कारण,  TVS स्पोर्ट ES+ ही बाईक खास करून अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे जे कमी किमतीत, जास्त मायलेज आणि स्टायलिश लुक असलेली बाईक शोधत आहेत. कंपनीने ही नवीन बाईक लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट 110 सीसी बाईकचा नवीन ‘एस+ (ES+)’ व्हेरिएंट लाँच केला आहे. या बाईकला आकर्षक फिचर्स, स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखले जाते.

नव्या बाईकमध्ये काय विशेष?

भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी TVS ने त्यांच्या लोकप्रिय स्पोर्ट बाईकचा नवीन व्हेरिएंट ES+ सादर केला आहे. दिल्लीमध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत फक्त 60,881 रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम मायलेज. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही बाईक प्रती लिटर 65 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देते.

टीव्हीएस स्पोर्ट ES+ मध्ये 109.7 सीसी, सिंगल सिलिंडर, 4-स्ट्रोक, BS6.2 इंजिन आहे. हे इंजिन 8.19 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह, ही बाईक 90 किमी/तास वेग गाठू शकते. शहरात 83.09 किमी/लीटर आणि हायवेवर 66.34 किमी/लीटर मायलेज मिळते. बाईकचा लांबी 1950 मिमी, रुंदी 705 मिमी आणि उंची 1080 मिमी आहे. गॅल्व्हनाइज्ड स्टील फ्रेमसह, 175 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि 1236 मिमी व्हीलबेस बाईकला चांगला स्टॅबिलिटी आणि आरामदायक राईड देतात. सीट हाइट 790 मिमी असून, 112 किलो वजनामुळे ती हलकी आणि सुलभ राईडसाठी योग्य आहे.

भारतीय ग्राहकांची पसंती मिळणार?

TVS स्पोर्ट ES+ ही बाईक खास करून अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे जे कमी किमतीत, जास्त मायलेज आणि स्टायलिश लुक असलेली बाईक शोधत आहेत. सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता ही बाईक मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. बाजारात ही बाईक हिरो स्प्लेंडरला थेट स्पर्धा देणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News