पहलगाम हल्ल्यातील मृत्यांच्या नातेवाईकांना 50 लाखाची मदत तर सरकारी नोकरीत सामावून घेणार, राज्य सरकारची घोषणा

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करण्याची घोषणा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे. या सरकारच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

मुंबई – गेल्या मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांना जीव गमावावा लागला. या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवली, पनवेल आणि पुणे जिल्ह्यातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या आल्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या, अशी जनसामान्यांची भावना आहे. दुसरीकडेर मृतांच्या नातेवाईकावर आपल्या घरातील व्यक्ती गेल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आता राज्य सरकारने पाऊल उचलले असून, त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाखांची मदत…

दरम्यान, एक आठवडापूर्वी जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील देखील सहा पर्यटक होते. या पर्यटकांमध्ये पुणे, पनवेल आणि ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील पर्यटकांचा समावेश होता. आता पहेलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करण्याची घोषणा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे. या सरकारच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

सरकारी नोकरीत देखील स्थान मिळणार…

एकीकडे पहेलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करण्याची घोषणा सरकारने केली असताना, दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीत देखील स्थान मिळणार आहे. कारण जे पर्यटन मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यातील कित्येकजण हे त्यांच्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांच्या घरातील कमवते व्यक्ती होते. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्यामुळं घरातील कमवती गेल्याने उदरनिर्वाह कसा चालवायचा? घर कसे चालवायचे? असा प्रश्न त्या कुटूंबासमोर पडला आहे. म्हणून सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीत देखील समावून घेतले जाणार आहे. असा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News