उन्हाळ्यात थंड पदार्थांचे सेवन अधिक वाढते. दही, ताक यासारख्या गोष्टी केवळ चविष्टच नाहीत तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारतात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. पण, तुम्हाला माहिती आहे का की उन्हाळ्यात दही खाणे प्रत्येकासाठी फायदेशीर नसते? उन्हाळ्यात दही खाण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. दही थंड आणि पचनाला जड असल्याने, उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने काही लोकांना पोटदुखी, अपचन आणि गॅस होऊ शकतो. काही व्यक्तींना दही खाल्ल्याने ऍलर्जी किंवा त्वचेची समस्या येऊ शकते.
कोणत्या रुग्णांनी दही खाणे टाळावे?
किडनी स्टोन
उन्हाळ्यात अनेकांना दही खाणे आवडते. ते चविष्ट आणि पौष्टिक आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की किडनी स्टोनच्या रुग्णांनी दही कमी प्रमाणात खावे किंवा अजिबात खाऊ नये? दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. मूत्रपिंडातील दगड तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे मूत्रात जास्त कॅल्शियम असणे. जेव्हा कॅल्शियम आणि इतर खनिजे मूत्रात क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होतात तेव्हा किडनी स्टोन तयार होतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर त्यात कॅल्शियमही मुबलक प्रमाणात असते. असे पदार्थ खाल्याने, किडनी स्टोनची समस्या अधिक वाढते आणि वेदना होतात म्हणून असे पदार्थ खाणे टाळले पाहीजे. किडनी स्टोनच्या रुग्णांनी दही कमी प्रमाणात सेवन करावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेवन करावे.

अस्थमा
दम्याच्या रुग्णांसाठी दही हानिकारक आहे. ते खाल्ल्याने श्वसनाशी संबंधित त्रास वाढू शकतो. जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल तर तुम्ही दही खाणे टाळावे. दह्याचे स्वरूप थंड असते आणि ते आंबट असते. दही खाल्ल्याने कफ तयार होऊ शकतो आणि दम्याची लक्षणे आणखी वाढू शकतात. याव्यतिरिक्त, दह्यामध्ये काही प्रथिने असतात जी काही लोकांमध्ये ऍलर्जी निर्माण करू शकतात.
लॅक्टोज इनटॉलरेंस
जर तुम्ही लॅक्टोज इनटॉलरेंसचे रुग्ण असाल तर दह्याचे सेवन टाळावे. अशा लोकांना दूध आणि दही पचत नाही. जर तुम्ही दही सेवन केले तर अतिसार आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते.
संधिवात
संधिवात हा एक आजार आहे ज्यामध्ये सांध्यामध्ये वेदना, सूज आणि कडकपणा येतो. संधिवाच्या रुग्णांनी नियमितपणे दही खाणं टाळावं. यामुळे साधेदुखीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. दह्यातील काही प्रथिने संधिवाताची लक्षणे वाढवू शकतात. याव्यतिरिक्त, दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे काही लोकांमध्ये पोटफुगी वाढवू शकते. जर तुम्हाला संधिवात असेल तर दही खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)