गुडघ्यांचा वापर नेहमीच शारीरिक हालचालींमध्ये केला जातो. मग ते चालणे असो, धावणे असो किंवा पायऱ्या चढणे असो. पण वयानुसार गुडघेदुखीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याशिवाय, दुखापत किंवा जास्त व्यायाम आणि वजन उचलण्यामुळे देखील वेदनांची समस्या वाढते. खरं तर, अनेक प्रकारच्या व्यायामांमुळे गुडघ्यांभोवती दबाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत, योग्य व्यायाम निवडणे खूप फायदेशीर ठरते. व्यायामामुळे गुडघ्याचे कार्य सुधारण्यास, वेदना कमी करण्यास आणि वजन कमी करण्यासदेखील मदत होते. गुडघेदुखीचे कारण आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी आज आपण काही सोपे व्यायामप्रकार जाणून घेणार आहोत.
गुडघेदुखीची सर्वसासामान्य कारणे-
हार्वर्ड हेल्थच्या मते, गुडघा हा कंबर आणि पाय यांच्यातील एक महत्त्वाचा सांधा आहे. आणि वेदना बहुतेकदा पायाच्या वरच्या किंवा खालच्या भागात होणाऱ्या समस्यांमुळे होतात. खरं तर, कमकुवत कंबरेचे स्नायू गुडघ्यांवर जास्त दबाव आणतात, ज्यामुळे गुडघ्याच्या वेदना वाढतात. त्याच वेळी, कंबरेच्या सांध्याभोवतीचे स्नायू बळकट केल्याने वेदनांपासून आराम मिळू शकतो. याशिवाय, गुडघ्याच्या स्नायूंमध्ये वाढत्या ताणामुळे वेदना होतात. अशा परिस्थितीत, स्ट्रेचिंग करून ही समस्या सोडवता येते.चला तर मग जाणून घेऊया गुडघ्याच्या वेदना कमी करण्याचे सोपे उपाय.

१) वॉल सीट्स-
भिंतीच्या आधाराने केलेला हा व्यायाम गुडघ्यांची हालचाल सुधारतो. यामुळे गुडघे वाकवताना होणाऱ्या वेदना मोठ्या प्रमाणात टाळता येतात. याव्यतिरिक्त, क्वाड्रिसेप्स स्नायूंची ताकद सुधारू लागते.
२)सिंगल लेग स्ट्रेच-
पायांच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी लेग स्ट्रेचिंग फायदेशीर ठरते. एका वेळी एक पाय वर करून केला जाणारा हा व्यायाम गुडघेदुखीपासून आराम देतो. याव्यतिरिक्त, तुमची पाठदुखीदेखील कमी होऊ शकते.
३)नी रोल एक्सरसाइज-
गुडघेदुखी कमी करण्यासाठी नी रोल एक्सरसाइज करता येते. गुडघे वाकवून केला जाणारा हा व्यायाम लवचिकता वाढवतो आणि शारीरिक थकवा कमी करतो. सकाळी उठल्यानंतर आणि अंथरुणावर झोपल्यानंतरदेखील हा व्यायाम करता येतो.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)