Mango ice cream: रसाळ आंब्यापासून घरातच बनवा थंडगार आईस्क्रीम, पाहा साहित्य आणि रेसिपी

mango ice cream recipe: घरातच बनवा थंडगार मँगो आईस्क्रीम, एकदम सोपी आहे रेसिपी

How to make mango ice cream at home:  उन्हाळ्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे आंबा होय. या फळाची चव घेण्यासाठी अनेक लोक वर्षभर वाट पाहतात. आंब्यापासून आंब्याचा पापड, आंब्याचा सरबत आणि आंब्याचा शेक असे अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात. तुम्ही कधी घरी ताज्या, रसाळ आंब्यांपासून बनवलेले मँगो आईस्क्रीम खाऊ पाहिले आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी मँगो आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ते कधीही खाऊ शकता. तुम्ही रात्रीच्या जेवणानंतरदेखील खाऊ शकता.

 

साहित्य-

दूध – २ कप
क्रीम – ३ कप
पिकलेले आंबे (प्युरी) – २ कप
आंबा (तुकडे करून) – २ कप
कस्टर्ड पावडर – २ टेबलस्पून
व्हॅनिला एसेन्स – १ टेबलस्पून
साखर – २ कप

 

रेसिपी-

– मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी, प्रथम कस्टर्ड एक चतुर्थांश कप दुधात मिसळा आणि बाजूला ठेवा. यानंतर, उरलेले दूध आणि साखर एकत्र गरम करा. साखर दुधात पूर्णपणे विरघळू द्या आणि उकळू द्या. उकळायला सुरुवात झाली की, कस्टर्डचे मिश्रण घाला आणि पुन्हा उकळा.

– मंद आचेवर एक मिनिट शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. आता ते थंड होऊ द्या. त्यात आंब्याची प्युरी, आंब्याचे तुकडे, क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स घाला. त्यांना चांगले मिसळा आणि घट्ट झाकण असलेल्या कंटेनरमध्ये ठेवा.

– पूर्णपणे स्थिर होण्यासाठी काही वेळ फ्रीजरमध्ये ठेवा. यानंतर, ते बाहेर काढा आणि हँड ब्लेंडरच्या मदतीने फेटा आणि परत फ्रीजरमध्ये ठेवा.

– लक्षात ठेवा की डब्याचे झाकण घट्ट बंद असले पाहिजे. त्यावर बर्फाचा थर तयार होऊ देऊ नका. पुन्हा फेटून घ्या आणि परत फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. काही वेळाने तुमचा मँगो आइस्क्रीम तयार होईल.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News