पावसाळ्यात गरमागरम पकोडे मिळाले तर पावसाळ्याची मजा द्विगुणीत होते. पावसाळ्यात अनेकदा लोकांना घरी चहासोबत चविष्ट नाश्ता पकोडे खायला आवडते. पावसाळ्यात कुरकुरीत काहीतरी खायचं असेल, तर पोहे पकोडे एक उत्तम पर्याय आहे. हे बनवायला खूप सोपे आहे. याशिवाय, या पकोड्याचा कुरकुरीतपणा खाद्यप्रेमींना आवडतो. जर तुम्हालाही या चविष्ट नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या…
साहित्य
- पातळ पोहे – १ कप
- बेसन – १/२ कप
- बारीक चिरलेला कांदा – १/२ कप
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – १-२ (चवीनुसार)
- बारीक चिरलेली कोथिंबीर – २ चमचे
- आलं-लसूण पेस्ट – १ चमचा
- हळद – १/४ चमचा
- लाल तिखट – १/२ चमचा (चवीनुसार)
- धणेपूड – १/२ चमचा
- जिरे – १/२ चमचा
- ओवा – १/४ चमचा
- मीठ – चवीनुसार
- तेल – तळण्यासाठी
कृती
- पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि १५-२० मिनिटे भिजत ठेवा.
- भिजलेले पोहे हाताने चांगले चुरून घ्या.
- एका भांड्यात पोहे, बेसन, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरे, ओवा आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
- जर मिश्रण जास्त कोरडे वाटत असेल तर थोडेसे पाणी शिंपडा.
- कढईत तेल गरम करा.
- हाताने छोटे-छोटे पकोडे वळून गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- गरमागरम पोहे पकोडे टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी सोबत सर्व्ह करा.
टीप
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि भाज्या ऍड करू शकता.
- पकोडे तळताना तेल जास्त गरम नसावे, नाहीतर ते बाहेरून लवकर लाल होतील आणि आतून कच्चे राहतील.
- पकोडे तळताना तेलात जास्त गर्दी करू नका, थोडे-थोडे करून तळा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)
