सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. दिवसभर बसून काम करणे आणि खूप कमी शारीरिक हालचाल केल्याने त्याचा थेट परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दिसून येतो. सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, अनेकांना नेहमीच प्रश्न पडतो की, खाण्यासाठी लाल सफरचंद चांगले की, हिरवे सफरचंद चांगले. तर दोन्ही सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला हिरव्या सफरचंदचे फायदे सांगणार आहोत. जाणून घेऊया…
वजन कमी करण्यास मदत करते
पचन सुधारते
हिरव्या सफरचंदामध्ये फायबर असते, जे पचनासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या समस्या दूर होतात. हिरव्या सफरचंदात विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसार यांसारख्या समस्या टाळता येतात. हिरव्या सफरचंदामुळे पाचक रस तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे अन्न पचनास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करते
हिरव्या सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हिरव्या सफरचंदांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर
हिरव्या सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. हिरव्या सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने ते त्वचेला चमकदार आणि तरुण ठेवण्यास मदत करतात. तसेच, ते त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग कमी करण्यासही मदत करतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर
हिरव्या सफरचंदामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ते दृष्टी सुधारण्यास आणि मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या समस्या टाळण्यास मदत करते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)