Dr. Babasaheb Ambedkar Marathi Quotes: भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना, त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याची जात, धर्म, भाषा किंवा वर्ग काहीही असो समानता, न्याय आणि स्वातंत्र्याचा अधिकार असल्याची खात्री केली. त्यांचे संविधान आजही आपल्यासाठी सर्वात मजबूत लोकशाहीचा पाया आहे.

सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा-
डॉ. आंबेडकरांचे जीवन केवळ शिक्षण किंवा संविधानापुरते मर्यादित नव्हते . तर ते एक सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता, जातिवाद आणि सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात भाग घेतला. दलित, महिला आणि वंचितांना स्वाभिमान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक चळवळी सुरू केल्या. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे प्रेरणादायी विचार एकमेकांना शेअर करूया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार-
– ”तुम्हाला तुमचे हक्क मिळवायचे असतील संघर्ष करायला शिका. त्यानंतरच तुम्हाला तुमचे हक्क मिळतील” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-“बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे” आयुष्यात आपण सतत काहीतरी शिकत राहिले पाहिजे. आपले ज्ञान वाढविण्यावर जोर दिला पाहिजे. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-”जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-“माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा.” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
– ”नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-”शिक्षण हे वाघिणीचे दूध, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहात नाही”. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-“दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर