मुंबई : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता बरचेश पर्यटक सुखरुप परतले. पण यातील जखमी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर हॉस्पिटल, गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केइएम हॉस्पिटल, आणि आर एन कूपर हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्य सेवा विविध पातळ्यांवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत…
दरम्यान, याच रुग्णालयांमध्ये रात्री ४ ते सकाळी ९ या वेळेत तणाव, निद्रानाश, अस्वस्थता, घटना पुन्हा अनुभवण्याची भावना यासाठी आपत्कालीन समुपदेशन व औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतील या चार प्रमुख महापालिका रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) ची शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती यासह सेवा दिल्या जाणार आहेत.

संपर्क नंबर…
हिटगुज (HITGUJ) या आत्महत्येच्या प्रतिबंधासाठीच्या ०२२-२४१३१२१२ या दूरध्वनी हेल्पलाइनचा वापर करून सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत तज्ज्ञ समुपदेशक मानसिक लक्षणांची तपासणी करतील व आवश्यकतेनुसार रुग्णालयात पाठवण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा :
नायर हॉस्पिटल
डॉ. हेनल शाह (इन्चार्ज) : 9323193505
डॉ.जान्हवी केदारे (युनिट प्रमुख) : 93222 39997
डॉ.अल्का सुब्रमण्यम: 9820143245
केइएम हॉस्पिटल
डॉ.अजित नायक (विभाग प्रमुख) : 98703 14844
डॉ. नीना सावंत (युनिट प्रमुख) : 9930583713
डॉ.क्रांती कदम : 99209 69088
डॉ.शिल्पा आडारकर : 98201 39158
सायन हॉस्पिटल
डॉ.निलेश शाह (विभाग प्रमुख) : 8879564532
डॉ.हिना मर्चंट : 9930395679
कूपर हॉस्पिटल
डॉ .देवराज सिन्हा (इन्चार्ज) : 9869989894