तुम्हीही वेलचीची साल फेकून देता का? जाणून घ्या जबरदस्त फायदे

वेलचीची साल आरोग्यासाठी चांगली की वाईट?

वेलची ही भारतीय स्वयंपाकघराचा एक भाग आहे. ती वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरले जाते. वेलचीच्या बिया कोणत्याही अन्नाची चव आणि सुगंध दोन्ही बदलू शकतात. त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म देखील आढळतात. वेलचीच्या बियाच नाही तर त्याची साले देखील आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात. बहुतेक लोक या सालांचे फायदे जाणून न घेता त्यांना निरुपयोगी समजून फेकून देतात. वेलची पचनापासून ते डोळ्यांपर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही ती वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता.

वेलचीच्या सालीचे फायदे

पचनशक्तीसाठी

वेलचीच्या सालीमध्ये पचनशक्ती सुधारण्याचे गुणधर्म असतात. आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते.

त्वचा

या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. वेलचीची साल बारीक करून त्यात मध घालून स्क्रब बनवा. चेहरा आणि मानेवर वापरा.असे केल्याने त्वचेवरील डाग आणि मुरुमे कमी होतात.

पाणी

वेलचीच्या सालीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. यासाठी 2-3 वेलचीची साल गरम पाण्यात उकळून त्याचे पाणी प्यावे. हे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.

चहा

चहाचा स्वाद वाढवण्यासाठी देखील तुम्ही वेलचीच्या सालींचा वापर करू शकता. यासाठी 2-3 वेलचीची साल गरम पाण्यात 10-15 मिनिटे उकळून प्यावी याने चहाची चव वाढते. हा चहा पचनशक्ती सुधारतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News