Marathi recipe for Tamarind chutney: चिंचेच्या चटणीचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळ्यात गुळ-चिंचेची चटणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. साधारणपणे, कोणत्याही ऋतूत गूळ-चिंचेच्या चटणीशिवाय स्ट्रीट फूडचा आस्वाद अपूर्ण राहतो. इतकेच नव्हे तर या चटणीशिवाय अनेक स्नॅक्सची चवच जाते. या चटणीची खासियत अशी आहे की जर ती एकदा बनवली तर ती अनेक दिवस रेफ्रिजरेटरमध्ये स्टोर करून ठेवता येते. आज आपण ही आंबट-गोड चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
साहित्य-
-१०० ग्रॅम चिंच
-५० ग्रॅम गूळ
-५० ग्रॅम साखर
-१/२ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून लाल तिखट
-२ टेबलस्पून ड्रायफ्रूट्स
-१ टीस्पून तेल
-१/२ टीस्पून काळे मीठ
-१ चिमूटभर हिंग
-१/४ टीस्पून हळद पावडर
-चवीनुसार मीठ

रेसिपी-
स्टेप १-
चिंचेची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात चिंच घाला. नंतर पाणी घाला, आणि गॅसवर ठेवा. आता १० मिनिटे उकळवा.
स्टेप २-
नंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर, चिंच मिक्सरमध्ये पाण्यासोबत बारीक वाटून घ्या. त्यानंतर ती चाळणीने गाळून घ्या.
स्टेप ३-
आता गॅसवर एक पॅन ठेवा. त्यात तेल घाला आणि गरम करा. नंतर जिरे आणि हिंग घाला आणि ते भाजून घ्या. नंतर हळद घाला आणि चिंचेची पेस्ट घाला.
स्टेप ४-
उकळी आल्यानंतर त्यात गूळ, साखर, तिखट, काळे मीठ आणि पांढरे मीठ घालून ५-६ मिनिटे शिजवा.