Mumbai Metro – 9 : उपनगरातील मीरा-भाईंदरकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. मीरा-भाईंदरकरांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मेट्रो-9 या 13.6 कि.मी लांबीच्या मार्गिकतील दहिसर-काशीगाव 4.5 कि.मी लांबीच्या मार्गिकवरील मेट्रो गाड्यांची आज चाचणी घेण्यात आली. त्यामुळं उर्वरित काम आणि चाचण्या पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबरपर्यंत दहिसर-काशीगाव टप्पा-1 वाहतूक सेवेसाठी खुला होईल. त्यामुळं दहिसर- मीरा-भाईंदरकरांचा प्रवास जलद होणार आहे.
दहिसर- मीरा-भाईंदरकरांचा प्रवास जलद होणार
दरम्यान, डिसेंबरपर्यंत दहिसर-काशीगाव टप्पा-1 सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रेदश विकास प्राधिकरणाचे नियोजन करत असून, त्यादृष्टीने काम सुरु आहे. आज दहिसर-काशीगाव 4.5 कि.मी लांबीच्या मार्गिकवरील मेट्रो गाड्यांची चाचणी घेण्यात आली. यावेळी वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. दरम्यान, मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याचे ९० टक्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-9 मुळे मीरा-भाईंदर, दहिसरकरांचा प्रवास अधिक जलद होणार असून, त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

मेट्रो कुठून कुठपर्यंत?
दहिसर पूर्व ते काशिगाव हा पहिला टप्पा असून, यात 4.4 किमी लांबीचा आहे. तर मेट्रो 9 मध्ये एकूण आठ स्थानक आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण चार स्थानके आहे.
मेट्रो-9 पहिला टप्पातील स्थानके
– दहिसर (पूर्व)
– पांडुरंग वाडी
– मिरगाव
– काशी गाव
दुसरा टप्पातील स्थानके
– साई बाबा नगर
– मेडितिया नगर
– शहीद भगतसिंग गार्डन
– सुभाषचंद्र बोस स्टेडियम