बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टला गंडा घालणाऱ्या तिच्या पर्सनल असिस्टंटला अटक करण्यात आली आहे. फेरफार करुन आलिया भट्टला तब्बल 77 लाखांचा गंडा वेदिकाने घातला. अटक करण्यात आलेली वेदिका प्रकाश शेट्टी ही काही दिवसांपूर्वी आलियाची पर्सनल असिस्टंट म्हणून काम पाहत होती. तिनं आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधून तब्बल 77 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पोलिसांकडून वेदीका शेट्टीला अटक
वेदिका शेट्टीला आलिया भट्टच्या प्रॉडक्शन हाऊस आणि आलियाच्या वैयक्तिक खात्यातून पैसे काढल्याबद्दल अटक करण्यात आलेली. वेदिकाला या दोन्ही खात्यांमधून बेकायदेशीरपणे 77 लाखांहून अधिक रक्कम मिळाली. दरम्यान, या प्रकरणात तपास सुरू आहे आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात आगामी काळात आणखी काही खुलासे होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वेदिकाकडून पदाचा, कामाचा गैरवापर
आलियाची आई सोनी राजदान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हा गुन्हा दाखल केला होता. सुमारे 5 महिन्यांनंतर आरोपीला बंगळुरू येथून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. वेदिकावर आलियाची बनावट सही करून दोन वर्षांत 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वेदिका शेट्टीनं आपल्या पदाचा आणि कामाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली.
आलियाच्या खात्यातून आणि कंपनीच्या पैशातून अनेक खोटी बिलं बनवली. खोटी बिलं तयार करुन तिनं रक्कम काढली. काही महिन्यांपासून ही रक्कम हळूहळू काढली जात होती. वेदिकाकडून होत असलेल्या व्यवहारांवर कंपनी आणि आलियाची टीम लक्ष ठेवून होती. अखेर त्यांनी तिची चौकशी करुन हा गैरव्यवहार उघडकीस आणला. त्यामुळे आता फसवणूकीच्या वाढत्या प्रकारांपासून कुणीही सुटू शकत नाही, हे अगदी स्पष्ट झाले आहे. आलियाच्या या फसवणूक प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.