हिंदू धर्माच्या शास्त्रांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. भगवान श्रीकृष्णांना बासरी खूप आवडायची. वास्तुशास्त्रात असे नमूद आहे की जर घरात बासरी ठेवली तर सुख-शांती नांदते. बासरीच्या सुरामुळे भक्तांमध्ये कृष्णाप्रती भक्तीची भावना निर्माण होते. बासरीचे संगीत वाजवल्याने आध्यात्मिक शांतीसोबतच मानसिक शांती देखील मिळते. अत्यंत प्रिय असलेली बासरी श्रीकृष्णाला नेमकी कोणी दिली, याबाबत एक पौराणिक कथा काय आहे, जाणून घेऊया…
पौराणिक कथा
द्वापार युगात, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर, त्यांना अनेक दैवी वस्तू मिळाल्या. त्यापैकीच एक म्हणजे बासरी. पौराणिक कथांनुसार, भगवान शंकराने त्यांना ही बासरी दिली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर, देवांचे देव महादेव यांनीही भगवान श्रीकृष्णाला भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना काहीतरी भेट म्हणून देण्याचा विचार केला. त्यांची इच्छा होती की त्यांची भेट भगवान श्रीकृष्णांसाठी एक आवडती वस्तू बनावी. भगवान श्रीकृष्णाची बासरी, जी ‘मुरली’ म्हणून ओळखली जाते, ती एका ऋषीच्या हाडांपासून बनलेली आहे. हे ऋषी म्हणजे महर्षी दधीची, ज्यांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी आपल्या अस्थी (हाडे) देवांना दिली होती. भगवान शंकरांनी महर्षी दधीचींच्या हाडांपासून ती बासरी बनवली आणि श्रीकृष्णाला भेट दिली.

दधीची ऋषी कोण होते?
घरात बासरी ठेवण्याचे फायदे
- बासरी घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात शांतता टिकून राहते.
- बासरी कृष्णाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे घरात बासरी ठेवल्याने कृष्णाची कृपा राहते.
- बासरीची मधुर धून ऐकल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो.
- बासरी घरात ठेवल्याने वास्तूशास्त्रातील दोष कमी होतात..
- बासरी घरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.
- बासरी स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)