वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवा ‘या’ मूर्ती, तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

घरात ठेवा 'या' मूर्ती, भासणार नाही कोणत्याच गोष्टीची कमी

वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व असते. असे म्हटले जाते की, वास्तुच्या नियमानुसार काही गोष्टी केल्यास शुभ फले प्राप्त होतात. परंतु, वास्तुशास्त्रातील काही नियम न पाळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू योग्य दिशेने ठेवल्याने त्याचे फायदे होतात. अनेकजण घराच्या सजावटीसाठी अनेक प्रकारच्या मूर्ती ठेवत असतात. वास्तुनुसार ‘या’ मूर्ती योग्य दिशेने ठेवल्या तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

देवी लक्ष्मीची मूर्ती

हिंदू धर्मात, देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते. म्हणूनच प्रत्येक घरात तिची पूजा केली जाते. जर आपण वास्तुशास्त्राबद्दल बोललो तर उत्तर दिशा खूप शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला देव-देवता राहतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घराच्या ईशान्य दिशेला धनाची देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला आर्थिक लाभ होतो. घरातील आर्थिक समस्याही दूर होतात.

हंसांची जोडी असलेली मूर्ती

घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. हंसांचा जोडा प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. पती-पत्नीमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहावे यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घरात हंसाची जोडी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, हंसांची जोडी घरात ठेवल्याने पती-पत्नीचे वैवाहिक जीवन सुधारते, असे मानले जाते. घरात हंसांच्या जोडीची मूर्ती ठेवल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तसेच, घरात हंसांच्या जोडीची मूर्ती ठेवल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते. वास्तुशास्त्रानुसार, हंसांची जोडी नैऋत्य दिशेला ठेवल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. 

पितळी कामधेनू गाय

हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. कामधेनू गायीला पूजनीय मानले जाते आणि तिच्यात ३३ कोटी देव असल्याचं म्हणतात. म्हणून तिची मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. कामधेनू गाईची मूर्ती ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते, असे मानले जाते.

कासवाची मूर्ती

वास्तुशास्त्रानुसार घरात धातुचा कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार कासव हे भगवान विष्णुचं रूप मानलं जातं. घरात कासवाची मूर्ती ठेवल्यास सुख-समृद्धी नांदते. म्हणूनच त्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही कासव घरात ठेवत असाल, तर ते घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. या दिशेने कासव ठेवल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते आणि कुटुंबात शांती आणि समृद्धी येते. कासव हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते आणि ते आर्थिक स्थिरता तसेच आरोग्य आणि कल्याणासाठी देखील शुभ मानले जाते. घराच्या ड्रॉइंग रूममध्ये धातूचा कासव ठेवल्याने संपत्ती वाढते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News