वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाला किती पैसे मिळणार? पराभूत संघावरही होणार पैशांचा वर्षाव

World Test Championship Prize Money :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या मोसमाचा अंतिम सामना पुढच्या महिन्यात खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने डब्ल्यूटीसी जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार, याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, विजेता संघ तर मालामाल होणारच, पण अंतिम फेरीत हरलेला संघ देखील भरघोस धनराशी मिळवणार आहे.

डब्ल्यूटीसीसाठी बक्षीस रकमेची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्यासाठी बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी ICC ने मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. WTC २०२३-२५ फाइनलसाठी ५.७६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी एकूण बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे, जी मागील दोन मोसमांच्या तुलनेत दुप्पट पेक्षा अधिक आहे.

या वेळेस जो संघ विजेता ठरेल, त्याला ३.६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मिळणार आहेत. ही रक्कम २०२१ आणि २०२३ मध्ये दिलेल्या १.६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर उपविजेत्या संघाला यावेळी २.१६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मिळणार आहेत.

आता आपण ही रक्कम भारतीय चलनामध्येही समजून घेऊया. चॅम्पियन संघाला सुमारे ३० कोटी ८१ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला १८ कोटी ५० लाख रुपये दिले जातील.

दक्षिण आफ्रिकेने केला जबरदस्त परफॉर्मन्स

दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम खेळ केला आहे. संघाने आपले सामने जिंकत सर्वप्रथम अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यावर विजय मिळवला होता, तर भारताविरुद्धची मालिका बरोबरीत संपली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियनही दमदरार कामगिरी करत संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला ३-१ ने पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवले.

आयसीसीचे चेअरमन जय शाह काय म्हणाले?

दरम्यान, आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी सांगितले, की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा हंगाम अतिशय रोमांचक ठरला. अखेरच्या क्षणापर्यंत हे निश्चित होत नव्हते की अंतिम सामन्यात कोणत्या दोन संघांमध्ये टक्कर होईल. सोबतच, लॉर्ड्स मैदानावर होणारा अंतिम सामना देखील तितकाच रोचक ठरेल, अशी आशा व्यक्त केली.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News