Digital Detox : आजच्या काळात गॅजेट्स आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत, कारण जीवनातील बहुतांश कामे आता याच गॅजेट्सच्या मदतीने होऊ लागली आहेत. मात्र सतत स्क्रीनवर वेळ घालवल्यामुळे मानसिक तणाव, डोळ्यांना थकवा आणि झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
अशा परिस्थितीत स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी डिजिटल डिटॉक्स करणे गरजेचे ठरते, ज्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहू शकतो आणि जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल.

नो-स्क्रीन टाइम सेट करा
दररोज एक ठराविक वेळ जसे की सकाळी १ तास आणि रात्री झोपण्याच्या आधी १ तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीपासून दूर राहा. यामुळे मेंदूला विश्रांती मिळेल आणि झोपेची गुणवत्ता सुधारेल.
सोशल मिडिया ब्रेक घ्या
आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सोशल मिडियापासून पूर्णपणे दूर राहा. तुमच्या फोनवरील नोटिफिकेशन्स बंद करा किंवा सोशल मिडिया अॅप्स अनइंस्टॉल करून बघा. यामुळे अनावश्यक स्क्रीन टाईम कमी होईल.
डिजिटल फ्री स्पेस तयार करा
घरी अशी एखादी जागा ठरवा जिथे कोणतीही डिजिटल डिव्हाइस नेण्याची परवानगी नसेल, जसे की डायनिंग एरिया किंवा बेडरूम. यामुळे कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
आउटडोअर अॅक्टिव्हिटी अंगीकारा
दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगाभ्यास करणे किंवा निसर्गात वेळ घालवणे या सवयी लावा. यामुळे केवळ शरीर सक्रिय राहील असं नाही, तर डिजिटल अवलंबित्वही कमी होईल.
पेपर बुक्स वाचा
ई-बुक्स किंवा ऑनलाइन लेख वाचण्याऐवजी हार्डकॉपी पुस्तकं वाचण्याची सवय लावा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि एकाग्रता वाढेल.
डिजिटल सनसेट पॉलिसी अंगीकारा
संध्याकाळी ७ किंवा ८ नंतर सर्व गॅजेट्स बंद करा किंवा कमीत कमी त्यांचा वापर मर्यादित करा. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि मेलाटोनिन हार्मोनचं संतुलन टिकून राहतं, ज्यामुळे झोप सुधारते.
डिजिटल फास्टिंग करून पाहा
महिन्यातून किमान १ दिवस पूर्णपणे डिजिटल फ्री घालवा. त्या दिवशी मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप यापासून पूर्णपणे दूर राहा आणि आपल्या छंदांवर – जसं की पेंटिंग, गार्डनिंग, मेडिटेशन – लक्ष केंद्रित करा.
हँड-वॉच आणि अलार्म क्लॉक वापरा
मोबाइलऐवजी घड्याळ वापरा आणि सकाळी उठण्यासाठी अलार्म घड्याळ वापरा. यामुळे वारंवार फोन चेक करण्याची सवय कमी होईल.