आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहेत. मग ती संवाद साधण्याची गोष्ट असो, बँकिंग, शॉपिंग, फ्लाइट तिकिट बुक करणे किंवा इतर करमणुकीच्या गोष्टी. अशा परिस्थितीत टिकाऊ आणि विश्वासार्ह फोनमध्ये गुंतवणूक करणे हे शहाणपणाचे ठरते.
या दृष्टीने iPhone हा एक लोकप्रिय पर्याय बनला आहे, विशेषतः त्याचे प्रायव्हसी फिचर्स, दीर्घकाळ टिकणारे हार्डवेअर आणि यूजर-फ्रेंडली अनुभवामुळे, आयफोन सर्वांचा आवडता बनला आहे.

दरम्यान, आजकाल बरेच लोक नवीन iPhone खरेदी करण्यापेक्षा सेकेंड हँड किंवा रिफर्बिश्ड iPhone घेणे अधिक किफायतशीर आणि शहाणपणाचा निर्णय मानतात. मात्र, सेकंड हँड आयफोन खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. मार्केट रिसर्च फर्म CCS Insight च्या माहितीनुसार, जगभरातील सेकेंड हँड स्मार्टफोन मार्केटमध्ये iPhone चा हिस्सा ६०% पेक्षा जास्त आहे. सॅमसंगच्या अँड्रॉइड डिव्हाइसेस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा हिस्सा सुमारे १७% आहे.
विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करा
ऑनलाइन अनेक ऑफर्स उपलब्ध असतात, पण त्यामध्ये बरेच स्कॅमही लपलेले असतात. नेहमी Amazon, BestBuy किंवा अधिकृत आणि विश्वासार्ह refurbished प्रोडक्ट्सच्या वेबसाइट्सवरूनच खरेदी करा. ग्राहकांच्या रिव्ह्यूज वाचा, रिटर्न पॉलिसी तपासा आणि खूप स्वस्त ऑफर असल्यास सतर्क रहा.
- बॅटरीची स्थिती नक्की तपासा
जास्ततर रिफर्बिश्ड iPhone मध्ये जुनी बॅटरी असते, पण Apple-सर्टिफाइड रिफर्बिश्ड फोनमध्ये नवीन बॅटरी आणि बाह्य कव्हरसोबत एक वर्षाची वॉरंटी देखील मिळते. इतर विक्रेत्यांच्या बाबतीत ही त्यांची धोरणावर अवलंबून असते, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी बॅटरीची स्थिती नक्की तपासा. - ग्रेडिंग सिस्टम समजून घ्या
प्रत्येक प्लॅटफॉर्म वापरलेल्या फोनच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी ग्रेडिंग सिस्टम (उदा. A, B, C) वापरतो. हे लक्षपूर्वक वाचा, ज्यामुळे फोनची स्थिती आणि किती वापर झाला आहे हे समजू शकेल.
फार जुना मॉडेल खरेदी करू नका
असा iPhone निवडा जो तीन पिढ्या जुना असेल. ५- ६ वर्षांपेक्षा जुने iPhones मध्ये iOS अपडेट्स येणे बंद होऊ शकते, ज्यामुळे अॅप्स आणि सुरक्षा फिचर्स व्यवस्थित काम करणार नाहीत.
- वॉटर डॅमेजची खात्री करा
iPhone मध्ये लिक्विड कॉन्टॅक्ट इंडिकेटर (LCI) असतो, ज्याद्वारे पाण्यामुळे नुकसान झाले आहे का ते तपासता येते. हा इंडिकेटर सामान्यतः सिम ट्रेच्या आत असतो. जर तो लाल रंगाचा असेल, तर याचा अर्थ फोन पाण्यात बुडाला आहे. पण जर तो पांढऱ्या किंवा चांदीच्या रंगाचा असेल, तर फोन व्यवस्थित आहे.