सुरक्षित प्रवासासाठी भविष्यात एसटीच्या “स्मार्ट बस” येणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा सुरक्षितते बरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणे, बस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवणे, यासाठी सुद्धा मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात खऱ्या अर्थाने एसटी स्मार्ट होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

ST Mahamandal : प्रताप सरनाईक यांनी परिवहन खात्याची सुत्रे हाती घेतल्यापासून या विभागत नवनवीन आणि अद्यावत प्रणाली आणण्याचा प्रयत्न करताहेत. गेल्या आठवड्यात हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या एसटी आणण्याची घोषणा सरनाईक यांनी केली होती. यानंतर आता एसटीच्या “स्मार्ट बस” येणार आहेत. भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासासह वक्तशीर बससेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या “स्मार्ट बसेस” घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार…

दरम्यान, स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार  आहे. प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. बसस्थानक व परिसरामध्ये पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या बसेस देखील पूर्णतः बंद राहतील. अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार आहे.

तसेच नवीन बसेस मध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती बरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे तातडीने संदेश प्रवाशांच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच एलईडी पॅनल लावण्यात येणार आहे. जाहिराताच्या माध्यमातून एसटीचा महसूल वाढण्यास मदत होईल, असं सरनाईक म्हणाले.

एसटीत एआय आणि जीपीएस…

आगामी काळात नव्या ३ हजार बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील या कॅमेराचा तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे. नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस प्रणाली, तंत्रज्ञान एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ ॲनालाइज यंत्रणा, याबरोबरच चोरी प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित (anti- theft technology ) बस लॉक सिस्टम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार आहे. या बसेमधून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी वाटले, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.


About Author

Astha Sutar

Other Latest News