वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीनं खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात वैभवने फलंदाजीने शतक झळकावले. भारत आणि इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभवने शतक झळकावले आहे. या तरुण भारतीय खेळाडूने फक्त ५२ चेंडूत शतक ठोकले, जे तरुण खेळाडूंमध्ये सर्वात जलद शतक आहे.
वैभव सूर्यवंशी याने मोठा विक्रम मोडला
वैभव सूर्यवंशीने हे शतक ठोकून इतिहास रचला आहे. वैभवने पाकिस्तानी खेळाडू कामरान गुलामचा ५३ चेंडूत शतक करण्याचा विक्रम मोडला. वैभवने फक्त ५२ चेंडूत शतक झळकावले. वैभवने ७८ चेंडूत १४३ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये या तरुण खेळाडूने १३ चौकार आणि १० षटकार मारले. यासह, वैभव सर्वाधिक शतके करणारा १९ वर्षांखालील खेळाडू बनला आहे.

विहान मल्होत्राची धमाकेदार खेळी
वैभव सूर्यवंशीशिवाय विहान मल्होत्रानेही शतक झळकावले आहे. विहानने १२१ चेंडूत १२९ धावा केल्या. या डावात विहानने १५ चौकार आणि ३ षटकार मारले. वैभव आणि विहान यांच्या खेळीमुळे भारत या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. भारताने ४३ षटकांत ६ गडी गमावून ३२९ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे १४ चेंडूत ५ धावा काढून बाद झाला. तर राहुल कुमार आणि हरवंश खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. अभिज्ञान कुंडूने ३३ चेंडूत २३ धावांची खेळी केली. पण विहान आणि वैभवच्या खेळीमुळे भारताने ३०० पेक्षा जास्त धावा केल्या.