अमेरिकेच्या राजकारणात आगामी काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्योगपती एलन मस्क यांनी अमेरिकेतील तिसरा मोठा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी एक्स वर पोस्ट करून ही घोषणा केली आहे. त्यामुळे एलन मस्क थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी आव्हान देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय यामुळे अमेरिकेत चालणाऱ्या द्वीपक्षीय व्यवस्थेला देखील चपराक बसणार आहे.
मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प मतभेद
एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सार्वजनिक आणि राजकीय विचारांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले होते. आता, हा नवीन पक्ष संभाव्य गेम चेंजर म्हणून उदयास येत आहे. मस्कची ‘अमेरिका पार्टी तंत्रज्ञानप्रेमी, स्वातंत्र्य समर्थक आणि प्रस्थापित विरोधी मतदारांना आकर्षित करू शकतो. हे तेच वर्ग आहेत जे काही प्रमाणात ट्रम्प समर्थक मानले जातात. पारंपारिक राजकारणाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचे आश्वासन देणारा नेता म्हणून मस्कची प्रतिमा तयार होत आहे. विद्यमान राजकीय रचनेवर असमाधानी असलेल्या मतदारांसाठी ही गोष्ट खूप आकर्षक असू शकते.

मस्क यांच्या पक्षाचा ट्रम्पना फायदा होईल?
पक्षाने महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले तर ते रिपब्लिकन पक्षाच्या मतपेढीचे विभाजन करू शकते. विशेषतः ज्या राज्यांमध्ये निवडणुकीचे अंतर खूपच कमी आहे. येथे, मतांची थोडीशी फेरफार देखील निकाल बदलू शकते. त्यामुळे अमेरिकेचे राजकारण आगामी काळात कसे बदलते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एलन मस्क यांनी “अमेरिका पार्टी” नावाची नवीन राजकीय पक्ष आज जाहीर केली, ज्याचे उद्दिष्ट अमेरिकेला त्यांची “स्वातंत्र्य” पुन्हा मिळवून देणे आहे. त्यांनी X (पूर्वी ट्विटर) वर झालेल्या मतदानात (65–80%) लोकांनी नवीन पक्षाच्या बाजूने मत दिल्यानंतर हा निर्णय घेतला . त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले: “By a factor of 2 to 1, you want a new political party … Today, the America Party is formed to give you back your freedom.” हा पक्ष एकदकीच्या शिक्केबंद “अनिपार्टी” प्रणालीत बदल घडवू शकतो, ज्यात ते केंद्रस्थ लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतील . पक्ष आणखी काही निवडणूक क्षेत्रांमध्ये लक्ष केंद्रित करून ही धोरण ठरवणार आहे .