आता शरीर…, धोनीनं दिले निवृत्तीचे संकेत? आज टॉसनंतर थाला नेमकं काय म्हणाला?

आयपीएल २०२५ चा ६६ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील टॉससाठी आले होते.

MS Dhoni Retirement News : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या क्रिकेटमधून निवृत्तीबाबत बऱ्याच काळापासून अटकळ बांधली जात आहे. आज रविवारी (२५ मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीदरम्यान, धोनीने एक असे वक्तव्य केले, जे त्याच्या चाहत्यांना धक्का देऊ शकते. धोनी म्हणाला की, ‘दरवर्षी मैदानावर परतणे हे एक आव्हान असते’.

धोनीने त्याच्या फिटनेसबद्दल काय म्हटले?

आयपीएल २०२५ चा ६६ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील टॉससाठी आले होते. या सामन्याचा नाणेफेक धोनीने जिंकला आणि त्याने संघासाठी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीदरम्यान खेळपट्टी आणि हवामानाबद्दल बोलल्यानंतर धोनीने त्याच्या संघाची स्थितीही सांगितली.

स्वतःबद्दल बोलताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला, की ‘त्याचे शरीर अजूनही फिट आहे. दरवर्षी एक नवीन आव्हान येते आणि ते टिकवून ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. धोनी पुढे म्हणाला की, जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचो तेव्हा मला फारशा समस्या येत नव्हत्या’.

कर्णधार म्हणून धोनीचा शेवटचा सामना?

या हंगामात एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला संघाची कमान ऋतुराज गायकवाड याच्याकडे होती. पण हंगामाच्या मध्यात ऋतुराज जखमी झाल्यामुळे माहीला पुन्हा एकदा संघाची जबाबदारी स्वीकारावी लागली. पुढच्या हंगामात गायकवाड पुन्हा एकदा सीएसकेचे नेतृत्व करताना दिसू शकतो. कर्णधार म्हणून हा धोनीचा सीएसकेसाठी शेवटचा सामना असू शकतो.

२०२६ मध्ये धोनी खेळेल का?

महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात खेळेल, की नाही याबद्दल माही कोणतेही विधान देऊ शकत नाही. धोनी नेहमीच म्हणतो, की आत्ता याबद्दल काहीही बोलणे योग्य नाही, ते त्यावेळी तुमचे शरीर कसे प्रतिसाद देत आहे यावर अवलंबून आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News