पाटना- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी त्यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांना पक्षातून आणि कुटुंबातून बेदखल केलंय. फेसबुक पोस्ट करुन याबाबतची माहिती लालूप्रसाद यादव यांनी माध्यमांना दिली.
तेजप्रताप यादव यांचे एका महिलेसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हारल होत होते. सोशल मीडियावर तेजप्रताप यादव यांनी दुसरं लग्न केल्याची चर्चा असतानाच लालूंनी त्यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा केलीय.

लालूप्रसाद यादवांनी काय लिहिलंय?
वैयक्तिक आयुष्यात नैतिक मुल्यांची अवहेलना करणं हे आपल्या सामाजिक न्यायासाठीच्या सामूहिक संघर्षाला कमकुवत करतं.
ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचं आचरण आणि बेजबाबदार वर्तन आमच्या कौटुंबिक मुल्यांच्या आणि संस्कारांप्रमाणे नाहीयेत. या सगळ्या परिस्थितीत त्यांना पक्षातून आणि कुटुंबापासून दूर करतो आहे. आतापासून पक्षात आणि कुटुंबात त्यांची कोणतीही भूमिका नसेल. पक्षातून तेजप्रताप यांना सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्यात येतंय.
तेजप्रताप यांच्या वैयक्तिक आयुष्यात चांगलं-वाईट आणि गुण-दोष जामून घेण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यांच्याशी जेही संबंध ठेवतील त्यांनी त्यांच्या विवेकातून हा निर्णय घ्यावा. सार्वजनिक जीवनात लोकलज्जा याचं महत्त्वाचं स्थान आहे. कुटुंबातील अज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात याच विकाराचं अंगीकरण आणि अनुसरण केलेलं आहे. धन्यवाद
निजी जीवन में नैतिक मूल्यों की अवहेलना करना हमारे सामाजिक न्याय के लिए सामूहिक संघर्ष को कमज़ोर करता है। ज्येष्ठ पुत्र की गतिविधि, लोक आचरण तथा गैर जिम्मेदाराना व्यवहार हमारे पारिवारिक मूल्यों और संस्कारों के अनुरूप नहीं है। अतएव उपरोक्त परिस्थितियों के चलते उसे पार्टी और परिवार…
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 25, 2025
अकाऊंट हॅक, तेजप्रताप यांचा काय दावा?
तेजप्रताप यांच्या नव्या नात्याची चर्चा शनिवारी संध्याकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोमुळे सुरु झाली. या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मी 12 वर्षांपासून अनुष्का यादव हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
काही वेळानंतर ही पोस्ट डिलिट करण्यात आली. पोस्ट डिलिट केल्यानंतर पाच तासांनी तेजप्रताप यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन फेसबुक अकाऊंट हॅक झाली असल्याची माहिती दिली. फेसबुकवर करण्यात आलेली पोस्ट ही बनावट असून फोटो एडिट करण्यात आला असल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.