मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आता काहीच सामने शिल्लक राहिले आहेत. मात्र, अजुनही प्लेऑफचे चित्र स्पष्ट झालेले नाही. 10 संघापैकी चैन्नई, हैद्राबाद, राजस्थान हे तीन संघ प्लेऑफमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या चार जागांसाठी सात संघामध्ये कडवी लढत होणार आहे.
सध्या गुणतलिकेत प्रथम क्रमांकावर राॅयल चॅलेंजर बंगळुरू हा संघ आहे. त्यांचे अजुनही तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांना प्लेऑफसाठी एक विजयही पुरेसा आहे. सध्या ते प्लेऑफसाठी पात्र असल्या सारखेच आहे मात्र इतर संघाच्या कामगिरीचा देखील त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लखनौ डेंजर झोनमध्ये
लखनौ सुपर जायंट्सने आत्तापर्यंत 11 सामन्यात पाच विजय आणि सहा पराजय स्वीकारले आहेत. त्यांच्या वाट्याला अजून तीन सामने आहेत. मात्र, या तीन सामन्यामधील एक पराजय देखील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
कोलकाता नाइट राइडर्स
अजिंक्य राहणे कोलकाताचे नेतृत्व करत आहेत. मागील हंगामात कोलकता आयपीएलचा विजेता ठरला होता. मात्र, यंदा त्यांचा प्रवास खडतर ठरला आहे. आत्तापर्यंत कोलकताच्या वाट्याला पाच विजय पाच पराजय आले आहेत. त्यामुळे लखनौप्रमाणेच एक पराजय देखील कोलकतावर भारी पडू शकतो आणि त्यांना प्लेऑफसाठी अपात्र ठरावे लागेल.
दिल्लीच्या आशा जिवंत
हैद्राबाद विरुद्ध दिल्ली पराजित होण्याची शक्यता होती. मात्र, पावसाने हा सामना रद्द झाला त्यामुळे एक पाँईट मिळाल्याने दिल्लीच्या आशा जिवंत आहे. पुढील तीन पैकी दोन सामने जिंकण दिल्लीसाठी आवश्यक असणार आहे. तरच ते पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकतील.
गुजरात मुंबईत चढाओढ
गुजरात आणि मुंबईमध्ये प्लेऑफमध्ये चढाओढ आहे. गुजरातचे 10 सामने झाले आहेत. आज त्यांची लढत मुंबईसोबत होत आहे. दोघांचे गुण 14 आहेत त्यामुळे ही लढत जिंकूण प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची दोघांना संधी आहे.
पंजाबला एका विजयाची आवश्यकता
पंजाबचे आत्तापर्यंत तीन सामने गमावले आहेत तर सात सामने जिंकले आहेत. 15 गुणांसह पंजाब दुसरा स्थानावर आहेत. त्यांना एक विजय देखील प्लेऑफसाठी पात्र ठरायला पुरेसा आहे.