लाडकी बहीण योजनेतून महिलांची घोर फसवणूक, 2100 रुपये कधी देणार? ठाकरे गटाचा सवाल

2100 रुपये द्यायचा वादा केला होता. परंतु आता सरकारमधीलच नेते हे आम्ही पाचशे रुपये देऊ, असं म्हणताय. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींची खोर फसवणूक केल्याचा आरोप माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी सरकारवर केला.

Kishori Pednekar – विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालाय. जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत पंधराशे रुपये मिळतात. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर शरसंधान साधले आहे. एकवीस रुपये काय झाले? निवडणुकीपूर्वी सरकारने जाहीरनाम्यात आणि प्रचारात म्हटलं होतं.

आम्ही 2100 रुपये देऊ असं म्हटले होते. पण आता सरकार फक्त १५०० रुपये देत आहे. २१००रुपयांचे काय झालं? ते तुम्ही कधी देणार? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी सरकारला विचारला. आज त्यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली.  त्यावेळी त्या बोलत होत्या.

योजनांना मूडदूस…

दरम्यान, लाडकी बहीण या योजनेत सरकारने महिलांची फसवणूक केली, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत. सरकारने आणि केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या होत्या. पण योजना आणल्यानंतर त्यांचा लाभ गाव खेड्यातली तळागाळापर्यंत पोहोचत असताना ती योजना मात्र लहान मुलाला जसा मुडदूस होतो तसं त्या योजनेला मूडदूस झाल्याचा पाहायला मिळते. म्हणजे नवीन योजना आणल्या की जुनी योजना याकडे दुर्लक्ष असा प्रकार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जुलै 2024 मध्ये निवडणुकापूर्वी जन्माला आली. परंतु तेव्हा ती योजना सुदृढ होती, आता मात्र तिला मूडदूस झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार…

पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, सरकारकडे निधी नाही आहे. म्हणून लाडक्या बहिण योजनेसाठी दुसऱ्या योजनेतले पैसा इकडे वळवला जातोय. आता सामाजिक न्याय विभागातील चारशे कोटीचा निधी या योजनेकडे वळवला आहे. त्यामुळे त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं रडगाणं सुरू आहे. मुळात सरकारकडे पैसे नसताना किंवा निवडणुकीपुरता या योजनांची घोषणा केली होती. आता नवीन योजनेला आणत असताना जुनी योजनेकडे दुर्लक्ष, या विरोधातच आम्ही सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.


About Author

Astha Sutar

Other Latest News