राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय कोणते?

‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविण्यात येणार आहे. दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण घेता येणार, आतापर्यंत यासाठी 288.92 कोटी रुपये वितरित करण्यात येणार

State Cabinet Meeting : आज पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईबाहरे म्हणजे अहिल्यानगर येथे पाड पडली. ही नेहमी बैठक मुंबईतील मंत्रालय किंवा सह्याद्री अतिथीगृह येथे होत असते. पण पहिल्यांदा मुंबईबाहेर बैठक पार पडली. या बैठकीत एक दोन नाहीतर तब्बल ११ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार आहे, तसेच व्यवसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

‘आदिशक्ती अभियान’ राबविणार…

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार, महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करण्यात येणार आहे. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ठ रुढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकासावर भर. हे अभियान राबविण्यासाठी 10.50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार

बैठकीत महत्वाचे निर्णय कोणते?

  • धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्यात येणार
  • धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव देण्यात येणार
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार
  • अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार
  • राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून 5503.69 कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे
  • अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करणार
  • राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय
  • ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी 2022-25 ऐवजी 2028 पर्यंत वाढविण्याचा निर्णय
  • नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-2025 जारी करण्याचा निर्णय

About Author

Astha Sutar

Other Latest News