मुंबई : आयपीएल 2025 च्या हंगामातील प्लेऑफचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. राॅयल चॅलेंजर बेंगळुरू हा संघ प्लेऑफसाठी सर्वप्रथम पात्र ठरण्याची शक्यता आहे. सर्वाधिक 16 गुण या संघाकडे आहे. त्यामुळे पुढील तीन सामन्यातील एक विजय त्यांचे स्थान प्लेऑफसाठी पक्के करू शकतो. प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी संघांमध्ये चढाओढ सुरू असताना या हंगामत प्लेऑफमधून पहिले तीन संघ बाहेर पडले.
प्लेऑफमधून सर्वप्रथम बाहेर पडणारा संघ महेंद्र सिंग धोनी कर्णधार असलेला चैन्नई सूपर किंग्ज ठरला. त्यानंतर राजस्थान राॅयल आणि दिल्ली विरुद्धचा सामना पावसाने रद्द झाल्याने हैद्राबाद देखील प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. अधिकृतरित्या हे तीन संघ प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत. तर, लखनौचा संघ काठावर आहे. त्यांना पुढील तीन सामन्यात एकही पराभव स्वीकारावा लागत तरी ते अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

महेंद्र सिंग धोनीची जादू चाललीच नाही
42 वर्षी महेंद्र सिंग धोनीची जादू आयपीएलमध्ये चालली नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड याला सुरुवातील अपयश आले मात्र दुखापतीमुळे तो बाहेर पडला. त्यानंतर महेंद्र सिंग धोनीकडे कर्णधारपद आले. मात्र, चैन्नईचे तारे काही चमकलेच नाहीत. 11 सामन्यात सामन्यात केवळ दोन सामने चैन्नईला जिंकला आले तर नऊ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे चैन्नईच्या नावावर अवघे चार गुण असून ते टेबल पाॅईंटमध्ये तळाला आहेत.
राजस्थान दबावाला पडला बळी
राजस्थानचा संघ युवा आणि संतुलित वाटत होता. कोच राहुल द्रविड या युवा खेळाडूंकडून चत्मकार घडवेल असे वाटत होते. मात्र, सुरुवातीच्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसन अनफिट झाला. मोठी धावसंख्या उभारण्यात राजस्थानला अपयश येत होते. तर, मोठ्या धावसंख्येच्या पाठलाग करताना अगदी जवळ जाऊन विजय मिळवता येत नव्हता. त्यामुळे यंदा 12 सामन्यात अवघे तीन विजय राजस्थानच्या नावे आहेत. आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.
हैद्राबाद नाव मोठे दर्शन खोटे…
यंदा सर्वाधिक चर्चा होती ती हैद्राबादच्या बॅटींगची अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन,हेनरिक क्लासेन, नितेश रेड्डी हे हैद्राबादाचे फलंदाज कोणत्याही संघाला धडकी भरवणारे होते. मात्र, या हैद्राबादची फलंदाजी काही चत्मकार दाखवू शकली नाही. पंजाब विरुद्द 245 धावा चेस करण्याचा एक विक्रम सोडला तर हैद्राबादचा संघ फार मोठा चत्मकार करू शकला नाही. दिल्लीच्या विरूद्धच्या सामन्यात त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. दिल्लीला कमी धावसंख्येत त्यांनी रोखले मात्र पावसामुळे हा सामना अनिर्णयित राहिला. त्याचा फटका हैद्राबादला बसला.