आयपीएलच्या हंगामातील आज 66 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्समध्ये खेळला जात आहे. पंजाब किंग्जने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. बारा सामन्यांमध्ये आठ विजयांचा प्रभावी विक्रम नोंदवला आहे. पंजाब किंग्ज पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सला पराभूत करून विजय मिळवला. पंजाब किंग्ज या सामन्यात विजय मिळवून टॉप-टूमध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. पंजाबचा संघ 17 पॉइंटने टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स 13 पॉइंटने टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आज आयपीएलचं चित्र नेमकं कस बदलतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोणता संघ जिंकणार?
हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना जयपूर येथे खेळविण्यात येणार आहे. त्यांचा मागील सामना भारत-पाकिस्तान तणावामुळे रद्द करण्यात आला होता. पंजाब किंग्जने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र त्यांना फक्त पहिल्या स्थानासाठी विजय मिळवायचा असून पंजाब किंग्जचे पारडे जड आहे. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, नेहल वधेरा, श्रेयश अय्यर, शशांक सिंग असे फलंदाज पंजाबकडे असून या स्पर्धेत त्यांनी फलंदाजीत सातत्य राखले आहे. प्रभसिमरन सिंगने 12 सामन्यांत 458 धावा केल्या आहेत. तसेच तो चांगली फलंदाजी करून ऑरेंज कॅपसाठी प्रयत्न करेल. पंजाब किंग्जची गोलंदाजी ही उत्तम असून युजवेंद्र चहल, हरप्रित ब्रार, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, कुलदीप सेन असे चांगले गोलंदाज आहेत.

त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल प्लेऑफ मधून बाहेर आहेत ते पंजाब किंग्जला रोखण्याचा प्रयत्न करतील. के. एल. राहुल, करुन नायर, डुप्लेसिस, अभिषेक पोरेल, स्टब्स, अक्षर पटेल असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत, तर टी नटराजन, मुकेश कुमार, मुस्ताफिजुर रहमान, कुलदीप यादव असे गोलंदाज आहेत.
पंजाब पहिले स्थान मिळवणार?
आजच्या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावणे हे पंजाबचे धोरण असणार आहे, यासाठी सांघिक पातळीवर विशेष प्रयत्न होतील. आयपीएल गुणतालिकेत पहिले दोन स्थान महत्वाचे मानले जातात. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्ससाठी सुरूवातीचा काळ चांगला गेला असला तरी नंतरच्या काळात दिल्ली कॅपिटल्सला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागणार आहे. आज पंजाबला नमवत दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएचा शेवट गोड करण्याचा मानस असणार आहे. आता आज दिल्लीचा संघ काही चमत्कार करतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.