‘चला उठा, कामाला लागा…’ मुख्यमंत्री फडणवीसांनी फुंकलं महापालिका निवडणुकीचं रणशिंग!

येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्याच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची अधिसूचना काढा असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. शिवाय 2022 पूर्वीची जी स्थिती होती त्यानुसार या निवडणुका घेण्यात याव्यात असंही सांगण्यात आलं आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षणही अगदी पूर्वीप्रमाणे राहणार आहे. राज्यात महायुती एकत्रित निवडणुका लढेल, असं प्रमुख नेत्यांनी आधीच जाहीर केलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगलीमधून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत.

काय म्हटले मुख्यमंत्री फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, दीड महिन्यात या सगळ्याच निवडणुका उरकल्या जातील.  जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल, त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकतीने काम करा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे, ते सांगलीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

महायुती एकत्रित निवडणूक लढणार

“आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिघंजण एकत्रित आहोत. आमची महायुती आहे. अपवादात्मक काही ठिकाणी शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्त्याची निवडणुकीमध्ये तिथे खूप तुल्यबळ असते. तिथे खूप जागा सोडता येत नाही. दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात. तिथे समजूतीने आम्ही वेगळे लढू.” असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आधीच मांडलं आहे. त्यामुळे महायुती एकत्रित लढणार हे स्पष्ट झालं आहे.

पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढावं लागले तरी एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार आम्ही करु. पण जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करु. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीचं स्पष्ट केलं आहे.

विरोधक निवडणुकीच्या संदर्भात शांत का?

राज्यात एकिकडे महायुतीच्या गोटात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत हालचाली दिसत आहेत. असं असताना विरोधी बाकांवरील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोणतीही लक्षवेधी हालचाल दिसत नाही. त्यामुळे विरोधक इतके गाफिल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी दुभंगली की काय अशीही चर्चा राज्यातील जनतेत दबक्या आवाजात सुरू आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित लढणार का, असाही अंदाज बांधला जात आहे. मात्र कोणत्याही मुद्द्यावर महाविकास आघाडीची अधिकृत भूमिका समोर येताना दिसत नाही.


About Author

Rohit Shinde

Other Latest News