जपमाळेत 108 मणी का असतात, त्यामागील रहस्य काय आहे, जाणून घ्या…

नामस्मरण किंवा मंत्राचा जप करण्यासाठी तुळस, स्फटिक, रत्न, रुद्राक्ष किंवा वैजयंतीची माळ वापरली जाते. ही जपमाळ 108 मण्यांची असते. जपमाळेत 108 मणीच का असतात, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल. यामागं अनेक कारणं आहेत.

हिंदू धर्मात जपमाळेचे विशेष महत्त्व आहे. अनेकदा तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांना जपमाळ करताना पाहिले असेल. आपण ज्या जपमाळेने जप करतो त्यात 108 मणी असतात. असे मानले जाते की जपमाळ जपल्याने मानसिक शांती मिळते. जपमाळे मध्ये 108 मणी असण्यामागे अनेक धार्मिक, ज्योतिषीय आणि वैज्ञानिक कारणे आहेत. ही संख्या संपूर्ण ब्रह्मांड, नक्षत्रे, सूर्य आणि ग्रहांशी संबंधित मानली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जपमाळेत 104 किंवा 106 नाही तर फक्त 108 मणी का असतात? जाणून घ्या या मागचं कारण…

ब्रह्मांड आणि नक्षत्रे

जपमाळातील 108 मणी संपूर्ण ब्रह्मांड आणि त्यात असलेल्या 27 नक्षत्रांशी संबंधित मानले जातात. प्रत्येक नक्षत्राला 4 चरणे आहेत, त्यामुळे या दोन्हीचा गुणाकार केल्यास 108 होतात. 

सूर्य आणि ग्रह

सूर्य एका वर्षात 216000 कला बदलतो. यात उत्तरायण आणि दक्षिणायन मिळून सूर्य सहा महिन्यांत 108000 वेळा बदलतो. यावरून मण्यांची संख्या निश्चित केली आहे. 

राशी आणि ग्रह

ज्योतिषशास्त्रानुसार, 12 राशी आणि 9 ग्रह आहेत, त्यांचा गुणाकार केल्यास 108 मिळतो. यामुळे जपमाळेत 108 मणी असले, तर ते 12 राशी आणि 9 ग्रहांना दर्शवतात.

शरीराच्या श्वासांशी संबंध

शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. * या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात.

मानसिक शांतता

जपमाळेचा जप केल्याने मानसिक शांतता मिळण्यास मदत होते. जप केल्याने मन एकाग्र होते आणि नकारात्मक विचार कमी होतात, ज्यामुळे मानसिक शांतता वाढते. मंत्रांचा जप केल्याने नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक विचार वाढतात, ज्यामुळे मानसिक शांतता वाढते. जपमाळेचा जप शांत आणि आरामदायक ठिकाणी करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News