इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर; रोहित शर्माची जागा ‘हा’ खेळाडू सांभाळणार

इंग्लंड दौऱ्यासाठी आता टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघ कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून 5 मॅचेसची टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीकडून मोठं रणकंदन केल्यानंतर हा संघ जाहीर करण्यात आला आहे, विशेष म्हणजे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी कऱणार याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. टीम इंडिया पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा हा 20 जून पासून सुरू होणार आहे.

शुभमन गिलकडे संघांचं नेतृत्व

भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रोहितनंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता. अखेर आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. आता रोहित शर्माची जागा शुभमन गिल घेत आहे, स्पष्ट झालं आहे.

टीम इंडियाचे खेळाडू

 

शुभमन गिल (कॅप्टन)

ऋषभ पंत (विकेटकीपर)

यशस्वी जयस्वाल

केएल राहुल

साई सुदर्शन

अभिमन्यु ईश्वरन

करुण नायर

नितीश रेड्डी

रवींद्र जाडेजा

ध्रुव जुरेल (विकेटकीपर)

वॉशिंग्टन सुंदर

शार्दुल ठाकूर

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

प्रसिद्ध कृष्णा

आकाश दीप

अर्शदीप सिंह

कुलदीप यादव

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्तम कामगिरी करणारा ओपनर बॅट्समन यशस्वी जयस्वाल, ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी यांना टीममध्ये कायम ठेवण्यात आले आहे. साई सुदर्शन आणि करुण नायर यांनाही टीममध्ये संधी देण्यात आली आहे. करुण नायरची 8 वर्षांनंतर टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. त्याने रणजी ट्रॉफी 2024-15 मध्ये विदर्भच्या टीमकडून खेळताना 863 रन्स केले. त्यामुळेच सिलेक्टर्सने त्याला टीममध्ये संधी दिली आहे. दरम्यान या दौऱ्यात खेळाडू आपलं कौशल्य कसं सिद्ध करतात, यावर पुढील भविष्य ठरणार आहे.

दौऱ्याचं वेळापत्रक

    पहिली टेस्ट मॅच – 20 जून ते 24 जून

    दुसरी टेस्ट मॅच – 2 जुलै ते 6 जुलै

    तिसरी टेस्ट मॅच – 10 जुलै ते 14 जुलै

    चौथी टेस्ट मॅच – 23 जुलै ते 27 जुलै

    पाचवी टेस्ट मॅच – 31 जुलै ते 4 ऑगस्ट


About Author

Rohit Shinde

Other Latest News