हैद्राबादच्या आशेवर पावसाचे पाणी, दिल्ली विरुद्ध सामन्या रद्द, प्लेऑफमधून बाहेर!

हैद्राबाद आज प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडला. त्यामुले प्लेऑफमधून बाहेर पडणाऱ्या संघांची संख्या तीन झाली आहे. यंदाच्या मौसमात सर्वात तळाला असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ सर्वप्रथम प्लेऑफमधून बाहेर पडला.

हैद्राबाद :  आयपीएलच्या दिल्ली विरूद्धच्या हैद्राबादच्या सामन्यावर पावसाने पाणी फिरले. त्यामुळे हैद्राबादसाठी प्लेऑफमधून बाहेर पडला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकायला लागले. दिल्लीचा संघ अवघ्या 133 धावांपर्यंत मजल मारली.

133 धावांचा पाठलाग करण्यासाठी हैद्राबादच संघ मैदानात उतरण्यापूर्वीच पावसाची सुरुवात झाली. पाऊस थांबून मॅचची प्रतिक्षा प्रेक्षक करत होते. मात्र, आऊट फिल्ड ओले असल्याने अखेर मॅच रेफरींनी हा सामना रद्द करण्याच निर्णय घेतला. हा सामना रद्द झाल्याने हैद्राबादचे प्लेऑफसाठीचे आव्हान संपूष्टात आले.

पॅट कमिन्सचा कहर

दिल्ली पहिल्यांदा बॅटींगसाठी मैदानात उतरली मात्र पॅट कमिन्सच्या गोलंदाजीपुढे त्यांनी लोटांगण घातले. पहिल्याच ओव्हरमध्ये कमिन्सने करून नायरला शुन्यावर बाद केले त्यानंतर दुसर्‍या ओव्हरमध्ये डुप्लेसीला आऊट करून झटका दिला. तसेच आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक पोरलला बाद केले. या तिघांचा झेल कमिन्सच्या बाॅलिंगवर विकेट किपर इशान किशन याने घेतले.

तीन संघ प्लेऑफमधून बाहेर

हैद्राबाद आज प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडला. त्यामुले प्लेऑफमधून बाहेर पडणाऱ्या संघांची संख्या तीन झाली आहे. यंदाच्या मौसमात सर्वात तळाला असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ सर्वप्रथम प्लेऑफमधून बाहेर पडला. त्यानंतर पंजाब विरुद्धच्य पराभवानंतर राजस्थान प्लेऑफसाठी अपात्र ठरला.

टाॅप तीन संघ

हैद्राबाद-दिल्लीच्या सामन्यानंतर पहिल्या क्रमांकावर बंगळुरुचा संघ काय आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर पंजाबने मजल मारली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा गुजरातचसंघ तिसऱ्या स्थानावर आहे. यंदा अडळखत सुरुवात करणाऱ्या मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News