दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर कधीही भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकते अशी परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लष्कर आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहे. रविवारी पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर युद्धाची ठिणगी कधी पडू शकते, अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता गृहमंत्रालयाने राज्यांना महत्त्वाची सूचना केली आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासाठी करण्यात येणारे माॅक ड्रिल तसेच ब्लॅकआाऊट बुधवारी (ता.7) देशभर करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभर माॅकड्रील होणार आहे.

MHA asks several states to conduct mock drills for effective civil defence; drills to include crash blackout measures
Read @ANI Story | https://t.co/Cg2f0SWCf3 #MHA #mockdrills pic.twitter.com/WxnenobwWJ
— ANI Digital (@ani_digital) May 5, 2025
मॉक ड्रिलमध्ये काय होते?
युद्धजन्य परिस्थितीसाठी नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी मॉकड्रील सुरक्षेसाठी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने हवाई हल्ल्याच्या सतर्कतेसाठी सायरण वाजवणे, हल्ल्याच्या वेळी नागरिक, विद्यार्थी आदींना स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षण देणे हल्ल्याच्या वेळी ब्लॅकआउट करणे लोकांना जागा रिकामी करायला लावणे किंवा बाहेर काढण्याची योजना तयार करणे आणि त्याचा सराव करणे याचा समावेश असतो.
यापूर्वी मॉक ड्रिल कधी झाली?
भारत पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये युद्ध झाले होते तेव्हा देखील मॉकड्रील झाली होती. आता पहलगाम हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा माॅकड्रील देशभर घेण्याच्या सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, चार मेला पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोनमेंट बोर्डाने माॅक ड्रिल घेण्यात आली. तसेच अर्धातासाचा ब्लॅकआऊट करण्यात आला होता.