भांडुपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलतोय, संजय निरुपम यांची संजय राऊत यांच्यावर बोचरी टिका

उबाठा खासदार भाजपकडे जाण्याच्या तयारीत असताना सर्व खासदारांना उद्धव ठाकरेंनी त्यांना रोखले होते. भाजपसोबत बोलणी सुरु असून आपण सर्वच भाजपबरोबर जाऊ, अशी गळ उबाठाने खासदारांना घातली होती, मात्र भाजपकडून उबाठासाठी दरवाजे बंद आहेत, असे निरुपम म्हणाले.

Sanjay Nirupam – पाकिस्तानाला पहलगाम हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. पाकिस्तानला घेरण्याची रणनिती सरकारकडून केली जात आहे. पाकिस्तानशी आयात बंदी लागू केली आहे. पाणी बंद केले आहे. समुद्री व्यापार बंद केला आहे. वायू सेनेकडून युद्धाभ्यास सुरु आहे, असे निरुपम म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र आणि भारतविरोधी बोलणाऱ्या राऊतचा निषेध करावा, असे आवाहन निरुपम यांनी जनतेला केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जशास तसा बदला घेण्यासाठी केंद्र सरकार आणि लष्कराचे प्रयत्न सुरु असतानाच काँग्रेस आणि भांडुपचा भोंगा पाकिस्तानची भाषा बोलत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर केली.

भारताकडून पाकिस्तानची कोंडी…

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करतील, असे निरुपम म्हणाले. सिंधू जल करार स्थगित केला असून आता चिनाब आणि झेलम नदीवर धरणे बंद करुन पाकिस्तानची कोंडी केली आहे. भांडूपचा भोंगा बोगस माणूस संजय राऊत म्हणाले की ते हुकुमशाही विरोधात लढतो, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करण्यासाठी उबाठाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मोदी-शहांची भेट घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट निरुपम यांनी केला.

लाडकी बहिण योजना बंद होणार नाही…

लाडकी बहिण योजना कोणीही बंद करु शकत नाही. तसेच आता १५०० रुपये देत आहेत भविष्यात त्यांना २१०० रुपये देण्याचा शब्द शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पूर्ण करतील, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला. भांडूप भोंग्याने लाडकी बहिण योजना बंद झाली अशी धडधडीत खोटी माहिती जनतेला दिली. राऊत यांना खोटं बोलण्याची, खोटा प्रचार करण्याची सवय झालीय. लाडकी बहीण योजना सुरु असून त्यांना दरमहा पैसे देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे निरुपम म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News