दिल्ली : यूपीएससीची परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शिखा दुबे देशात पहिली आली. तिने सांगितले की तीन पाच वेळा प्रयत्न केला. सहाव्या प्रयत्न ती यशस्वी झाली. शिखा दुबेचे देशभरातून कौतुक होत आहे. माजी IPS अधिकारी यशोधन झा याने शिखाचे अभिनंदन करत तरुणांना पाच वर्ष वाया न घालवण्याचा सल्ला दिला आहे.
यशोधन झा यांनी ट्विटवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शिखा दुबे हिचे अभिनंदन पण पाच वेळा प्रयत्न म्हणजे सहा वर्षांची मेहनत वाया. तारुण्याचा सर्वोत्मक वर्ष कोचींमध्ये वाया गेली नाहीत का? दरवर्षी पाच लाख युवक प्रयत्न करतात आणि इतकी वर्ष आपला वेळ एका परीक्षेसाठी वाया घालवतात.

दुसऱ्या क्षेत्रात प्राविण्य मिळाले असते
यशोधन झा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या देशातील तरुणांना एका परीक्षेसाठी इतकी वर्ष वाया घालायला लावणे योग्य आहे का? इतक्या वर्षांमध्ये त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून देशाला अधिक फायदा झाला असता. आपली परीक्षा व मुलाखत पद्धती बदलायला हवी. 25 व्या वर्षापर्यंत फक्त दोन संधी द्यायला हव्यात.
कोचिंगवाले बँकेचा फायदा करून देत आहेत
एका परीक्षेसाठी पाच सहा वर्ष वाया घालवून कोचिंग क्लासवाले बँकेंचे भले करत आहेत. यूपीएससी परीक्षेत बदल करून नेतृत्व, सचोटी आणि वचनबद्धता, तसेच सामान्य ज्ञानाची आवश्यकता असणाऱ्यांची निवड केली पाहिजे. यूपीएससीच्या ध्यासामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. तरुणांना 5 ते 6 वर्षे मेहनत करून चुकीची नोकरी मिळत आहे.