बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव यांचे निधन झाले आहे. मुकुल देव यांनी 24 मे रोजी, वयाच्या ५४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुकूलच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याने ‘आर… राजकुमार’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुकुल देव यांनी आतापर्यंत चित्रपटांसह मालिकांमध्येदेखील काम केले आहे. बॉलीवूडसह त्यांनी दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुकुल देव यांचा जन्म
मुकुल देव यांचा जन्म नवी दिल्ली येथे जालंधरजवळील एका गावात मूळ असलेल्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरी देव हे सहाय्यक पोलिस आयुक्त होते आणि त्यांनीच मुकुल यांना अफगाण संस्कृतीची ओळख करून दिली. त्यांचे वडील पश्तो आणि पर्शियन भाषा बोलायचे. जेव्हा मुकुल यांनी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात मायकल जॅक्सन यांच्या डान्सची नक्कल करत सादरीकरण केलं, तेव्हा त्यांना मनोरंजनविश्वाची ओळख पटली. तेव्हा ते आठवीत होते. या सादरीकरणासाठी त्यांना पहिल्यांदा मानधन मिळालेलं. त्यानंतर मुकुल यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीमधून पायलटचं प्रशिक्षण घेतलं.

शेवटचा प्रवास
मुकुल देव यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात भाऊ राहुल देव आणि कुटुंब आहे. मुकुल देव यांचे मोठे भाऊ आणि अभिनेता राहुल देव यांनी मुकुल देव यांच्या निधनाची सोशल मीडियावर माहिती दिली की, त्यांचा भाऊ मुकुल देव यांनी काल रात्री नवी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता दयानंद मुक्ती धाम येथे अंत्यसंस्कार केले जातील.
दीपशिखा नागपाल
मुकुल देव काही काळापासून आजारी होते
मुकुल देव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु काही सूत्रांनुसार, ते काही काळ आजारी होते आणि त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मुकुल देव गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. इतर अहवालांमध्ये असे म्हटले आहे की तो एकाकीपणाने त्रस्त होता आणि त्याचे वजनही वाढले होते.