अमेरिका अंतराळात शस्त्र तैनात करणार, काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांची ‘गोल्डन डोम’ महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना?

या शस्त्र स्पर्धेत गोल्डन डोम अस्तित्वात आल्यास भविष्यातील युद्धाचे संदर्भच बदलण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन डीसी – भविष्यात अंतराळातच दोन देशांतील युद्ध होण्याची शक्यता आहे. अंतराळातच शस्त्र तैनात असणार आणि अंतराळातच होणार उद्ध्वस्त. बड्या देशांकडून एकमेकांचे उपग्रह नष्ट करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या गोल्डन डोममुळे शस्त्रस्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. अमेरिकेच्या संरक्षणासाठी आणि चीन-रशियाशी शस्त्रस्पर्धा करताना अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्डन डोम लवकरच तयार होणार असल्याचं सांगितलंय.

पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भारत-पाक संघर्षात ड्रोन युद्ध आपण सर्वांनी अनुभवलं. ड्रोनच्या माध्यमातून किती अचूक मारा करता येतो, हे पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईनं दिसूनही आलं. झालेले ड्रोन हल्ले आणि ते परतवण्यासाठी भारतीय सैन्यानं केलेले प्रयत्न आकाशात आपल्याला दिसत होते. मात्र आता याही पलिकडे जात अंतराळातच युद्ध होणार असल्याचे संकेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळाताच शस्त्र तैनात करण्याची तयारी केलीय.

काय आहे गोल्डन डोम योजना

‘गोल्डन डोम’ असं या योजनेचं नाव असून, गेल्या काही काळापासून सुरु असलेलं हे मिशन लवकर पूर्ण होणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. गोल्डन डोम योजना म्हणजे अंतराळातून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून अमेरिका वाचवण्यासाठीची तयारी आहे. काय आहे गोल्डन डोम?

1. अंतराळात ‘गोल्डन डोम’ नावाचं अमेरिकेचं क्षेपणास्त्र संरक्षण कवच
2. संभाव्य आंतरराष्ट्रीय हल्ल्यांपासून अमेरिकेचं करणार संरक्षण
३. गोल्डन डोमची चार टप्प्यांत असणार कार्यप्रणाली
४. शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा शोध घेणार
५. क्षेपणास्त्रांना वेळेआधी नष्ट करणार
६. क्षेपणास्त्रांना आकाशात रोखणार
७. अंतराळातच क्षेपणास्त्रांना पूर्णतः निष्प्रभ करणार
८. उपग्रह, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेन्सर आणि लेझर यंत्रणेटा वापर
९. हल्ला ओळखण्याची आणि रोखण्याची क्षमता गोल्डन डोममध्ये
१०. भविष्यातील युद्धशक्ती अंतराळात केंद्रीत होणार

चीन आणि रशियाकडून वाढता धोका लक्षात घेता, अमेरिका आपली संरक्षण प्रणाली आंतराळातही मजबूत करणार आहे. चीनने काही महिन्यांपूर्वी पेंटागॉनचे तीन उपग्रह निष्क्रिय केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोल्डन डोम’ योजनेचं महत्त्व वाढलंय.

गोल्डन डोमची सुरुवात कशी?

1. 2019–2020 साली ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत ‘गोल्डन डोम’ या संरक्षण कवचाच्या संकल्पनेवर काम सुरू
२. अमेरिकेनं 2019 साली स्पेस फोर्सची स्थापना केली, ही स्वतंत्र सैन्य शाखा योजनेचा पाया
३. चीन आणि रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि उपग्रह नष्ट करणारं तंत्रज्ञान विकसीत केलं.
४. चीन-रशियाला प्रत्युत्तरासाठी अमेरिकेचा अंतराळ संरक्षण क्षमता वाढवण्याचा निर्णय
५. संशोधन संस्थांना आणि संरक्षण क्षेत्राला निधी देऊन प्रणाली विकसित करण्याचे आदेश
६. अमेरिकेच्या संरक्षण विभाग म्हणजेच पेटागॉनचा सक्रिय सहभाग
७. 24 मे 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अधिकृतपणे ‘गोल्डन डोम’ योजनेची घोषणा

ही योजना अमेरिकेच्या संरक्षण इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी अंतराळ योजना मानली जात आहे.

चीनचीही तगडी तयारी

गोल्डन डोममुळे भविष्यात युद्धशक्ती अंतराळात केंद्रीत होणार आहे. गोल्डन डोमच्या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडालीय.
अमेरिकेचा हा पुढाकार येत्या काळात अमेरिका, चीन आणि रशिया या देशांतील नव्या शस्त्रस्पर्धेची नांदी ठरू शकतो.
दुसरीकडे चीनने ‘जियु टियान’ड्रोन तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे एकाच वेळी 100 ड्रोनद्वारे हल्ला करणं शक्य आहे.

चीनचा नवा सुपर ड्रोन

१. ड्रोनची रेंज 7000 किलोमीटर, 15,000 मीटर उंचीवर उडू शकते.
२. टेक-ऑफ वजन 16,000 किलो असून 6,000 किलो पेलोड वाहण्याची क्षमता
३. शंभरहून अधिक छोटे ड्रोन वाहून नेण्याची क्षमता
४. ड्रोनमध्ये क्रूझ मिसाइल्स वाहून नेण्याची क्षमता
५. शत्रूच्या रडारला चकवा देत बचाव करण्याची क्षमता
६. युद्धासोबत सीमा निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन लॉजिस्टिक्ससाठी वापर

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News