सुई न टोचता, रक्त न घेता केवळ सेल्फीवर होणार रक्त चाचणी; हैदराबादेतील प्रयोग लवकरच महाराष्ट्रातही

स्मार्टफोन किंवा टॅब्लेटच्या कॅमेऱ्याने फक्त चेहऱ्याचा एक सेल्फी घेऊन अवघ्या काही सेकंदात तुमच्या आरोग्याचे अपडेट्स मिळू शकणार आहेत.

मुंबई – कुठल्याही रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर रक्त चाचणी हा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटकआजाराचं निदान करायचं असेल तर डॉक्टर रक्त चाचणी करतातच. अनेक जणांना सुई टोचून घेण्याची भीती वाटते, त्यामुळे रक्ताची चाचणी म्हटलं की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र आता रुग्णाच्या रक्ताची चाचणी सुई न टोचता होणार आहे.

हैदराबादच्या नीलोफर रुग्णालयात या क्रांतिकारी तंत्रज्ञानाची सुरुवात झाली आहे. भारतात प्रथमच सुई आणि वायरशिवाय केवळ चेहरा स्कॅन करून रक्त चाचणी करण्याचा प्रयोग यशस्वी झालाय. हैदराबादेत AI-आधारित ही रक्त चाचणी प्रणाली कार्यान्वित झाली आहे.

सेल्फीद्वारे होणार रक्तचाचणी

१. स्मार्टफोन किंवा टॅबलेटद्वारे सेल्फी काढला जाणार
२. अवघ्या 20 ते 60 सेकंदात ब्लड टेस्टचे रिपोर्ट मिळणार
३. रक्तदाब, ऑक्सिजन पातळी, हृदयगती, हिमोग्लोबिन कळणार
४. स्ट्रेस लेव्हलसह इतरही माहिती लगेच उपलब्ध होणार

वेदनारहीत रक्तचाचणी आणि तातडीनं मिळणारे रिपोर्ट्स हे याचं वैशिष्ट्य.

सुईविना रक्तचाचणी

१. ‘अमृत स्वस्थ भारत’ या नावानं हे तंत्रज्ञान ओळखलं जातंय.
२. फोटोप्लेथिस्मोग्राफी (PPG) तंत्रज्ञानावर आधारित
3. आर्टिफिशल इंटिलिजन्स म्हणजेच एआयचीही मदत
३. क्विक व्हायटल्स या हेल्थ-टेक स्टार्टअपकडून विकसित
४. नीलोफर रुग्णालय हे याचं भारतातील पहिलं प्रायोगिक केंद्र
५. अ‍ॅनिमियासारख्या आजाराचं वेळीच निदान होणं शक्य
६. तंत्रज्ञानातील डेटामध्ये गोपनीयता राखली जाते
७. केवळ अधिकृत वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच माहिती उपलब्ध

महाराष्ट्रातही लवकरच येणार तंत्रज्ञान

या नव्या सुविधेमुळे आरोग्य तपासणी वेदनारहित आणि झपाट्याने होणार आहे. नीलोफर रुग्णालयात यशस्वी अंमलबजावणीनंतर, या तंत्रज्ञानाचा पुढील टप्पा महाराष्ट्रात लागू होणार आहे. देशभरात AI-आधारित आरोग्य तपासणीचा व्यापक विस्तार यानिमित्तानं होताना दिसतोय. महाराष्ट्रासह भारतातील ग्रामीण भागात रोगांच्या निदानासाठी आणि उपचारासाठी याची मोठी मदत होईल, हे निश्चित.


About Author

Smita Gangurde

Other Latest News