बीडच्या स्थानिक राजकारणात वैद्यनाथ सहकारी बँकेच्या निवडणुकीचे महत्व मोठे आहे. अशा परिस्थितीत आता निवडणुकीच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानूसार बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळ निवडीसाठी निवडणुका अखेर जाहीर झल्या आहेत. या को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पंकजा मुंडे असून या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे.
17 जागांसाठी निवडणूक जाहीर
जिल्हा उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या या बँकेवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत आहे.

17 जागा व संचालक जागांचे आरक्षण
- सर्वसाधारण – 12 जागा
- अनुसूचित जाती – 1 जागा
- इतर मागासवर्गीय – 1 जागा
- भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग – 1 जागा
- महिला प्रतिनिधी – 2 जागा
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
- छाननी प्रक्रिया: 14 जुलै
- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 15 जुलै ते 29 जुलै
- चिन्हांचे वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी: 30 जुलै
- मतदानाचा दिवस: 10 ऑगस्ट, सकाळी 8 ते संध्याकाळी 4
- मतमोजणी: 12 ऑगस्ट, सकाळी 8 वाजल्यापासून सुरू
10 ऑगस्टला होणार मतदान
7 ते 11जुलै दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 14 जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. अंतिम यादी आणि चिन्हांचे वाटप 30 जुलै रोजी होईल. मतदान 10 ऑगस्टला – सकाळी 8 ते संध्या 4 वाजेपर्यंत होणार आहे.12 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल आणि त्यानंतर निकाल लागेल. बीड जिल्हा आणि परळीच्या स्थानिक राजकारणात या बँकेच्या निवडणुकीचे महत्व मोठे असल्याने राजकीय वर्तुळाच्या या निवडणुकीकडे नजरा लागल्या आहेत.