India -Pakistan warisan– मंगळवारी रात्री भारताने ‘सिंदूर ऑपरेशन’ करत हवाई हल्ला केला. यात अतिरेक्यांची ९ तळं आणि २६ अतिरेक्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. या ऑपरेशननंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत असताना, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारताने ईट का जवाब ईटसे दिया है…, असं म्हणत लष्कराचे आणि केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.
जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा सर्वांच्या मनात पाकिस्तान आणि अतिरेक्यांबाबत संतापाची भावना होती. संतप्त प्रतिक्रिया होत्या. यांना आता आरे ला कारे म्हणण्याची वेळ आली आहे. आता जशास तसे उत्तर द्यावे, पाकिस्तानमध्ये घुसून मारावे, अशी लोकांची प्रतिक्रिया होती.

भारताने इशारा दिला…
जरी 23 मिनिटांचा हा हल्ला असला तरी भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पुन्हा जर कुरापती केल्या…, कुरघोडी केल्या तर आम्ही शांत बसणार नाही. हा इशारा भारताने दिला आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून लष्कराचे तिन्ही दल, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री हे या हल्ल्याबाबत तयारी करत होते. ज्या आमच्या माता भगिनींचा सिंदूर पुसलं गेलं होतं. त्या सिंदूरचा बदला आम्ही सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहोत. आता जर पुन्हा पाकिस्तान किंवा अतिरेक्यांनी भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आम्ही शांत बसणार नाही. हा संदेश या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दिल्याचे शिंदेंनी म्हटले.
यह नया भारत है…
दरम्यान, 26 अतिरेक्यांचा खात्मा केलाय. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकार तसेच लष्कराचे मी अभिनंदन करतो. आणि हा नवीन भारत आहे… ये नया भारत है… नव्या भारताची ही ओळख आहे. जर तुम्ही आम्हाला आरे म्हटलं तर आम्ही कारे म्हणू, आणि तुमच्या देशात घुसून मारू हे भारताने पुन्हा एकदा दाखवले आहे. या हल्ल्याबाबत केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांनी लष्करासोबत बैठका घेतल्या. चर्चा केली…. नियोजन केले आणि मंगळवार रात्री सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून हवाई हल्ला केला. यात पीओकेमधील अनेक अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करण्यात आले. याबद्दल केंद्र सरकार आणि मोदींचे अभिनंदन करतो, असं शिंदे म्हणाले.