India Pakistan War : भारताने मंगळवारी रात्री पीओकेमधील दहशतवादी अड्डे केले. यामध्ये भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून इयर स्ट्राइक करत पाकप्राप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. या हल्ल्यात 26 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. भारताच्या या अचानक आल्यानंतर पाकिस्तान पुरता घाबरला आहे.
यानंतर भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकेल. अशी युद्धजण परिस्थिती असल्यामुळे भारत सरकार अधिक सतर्क झाले आहे. नागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रीलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राजधानी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

बैठकीला “हे” नेते उपस्थित राहणार…
दरम्यान, भारताच्या हल्ल्यानंतर सर्व स्तरातून भारताचे तिन्ही दलाचे आणि केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसकडून राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसेच महाराष्ट्रातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत किंवा अरविंद सावंत हे उपस्थित राहणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उपस्थित असणार आहेत. तर शिंदे गटाकडून गटनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित असणार आहेत.
गेल्या बैठकीला ठाकरेंची सेना गैरहजर…
या हल्ल्यापूर्वी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक झाली होती. तेव्हा शिवसेना ठाकरे गट अनुपस्थित राहिला होता. मात्र यावेळी ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आणि यापूर्वी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं होतं. यानंतर आज जी सर्वपक्ष बैठक होत आहे, त्या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार? भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याचा निर्णय घेणार का? युद्धाची घोषणा होणार का? अशा सर्व प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे.
आमचा पाठींबा असेल…
ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आता कोणीही याचे पुरावा मागणार नाही. कारण हल्ल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुरावा मागण्याची जागा सोडली नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला होता. परंतु या हल्ल्यानंतरही विरोधकांनी या हल्ल्याचे स्वागत करत पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. तसेच केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठींबा असेल असं काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच अनेक विरोधी पक्षानी म्हटले होते. यानंतर आज सर्वपक्षीय बैठक होत आहे.