‘Operation Sindoor’ : 10 मेपर्यंत देशातील 9 विमानतळं बंद राहणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आता केंद्र सरकार अधिक सतर्क झाले असून, देशातील प्रमुख नऊ शहरांमधील सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ही विमान सेवा 10 मे पर्यंत बंद करण्याचा केंद्र सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Air India : भारताने मंगळवारी रात्री पीओकेमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ईअर स्ट्रीक करत दहशतवाद्यांची नऊ तळ उध्वस्त केली. यात 26 पेक्षा अधिक अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. त्यामुळे भारताने काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकला चोख उत्तर दिलं आहे. या पार्श्वभूमीवरती युद्धजन परस्थिती उद्भवल्यास मॉक ड्रीलचे प्रशिक्षण ही देण्याचे सुरु आहे. या सर्व धरतीवर आता केंद्र सरकार अधिक सतर्क झाले असून, देशातील प्रमुख नऊ शहरांमधील सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ही विमान सेवा 10 मे पर्यंत बंद करण्याचा केंद्र सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

9 विमानतळं कोणती?

१ जम्मू काश्मीर
२ जोधपूर
३ अमृतसर
४ चंदीगड
५ राजकोट
६ भुज
७ श्रीनगर
८ लेह
९ जामनगर

पाकिस्तानात भीतीचे वातावरण…

भारताने पीओकेमध्ये अचानक हल्ल्या केल्यामुळे अतिरेक्यांचे मोठे नुकसान झाले असून, पाकमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरीसुद्धा पाकने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्यांनीही युद्धाची भाषा केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकते. या धर्तीवर नागरिकांना सुरक्षेसाठी मॉक ड्रीलचे प्रशिक्षण देण्याचे सुरू आहे. तसेच भारताने हल्ला केल्यानंतर दळणवळण यंत्रणा आणि या देशातील नागरिक तिकडे जाऊ नये आणि तिकडचे इकडे येऊ नये यासाठी प्रमुख 10 शहरातील विमानतळ सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 10 मेनंतर ही विमानसेवा पुन्हा सुरू करायची की नाही, यावर सरकार विचार करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News