चैन्नईचा जाता जाता कोलकताला दणका, प्लेऑफचे गणित बिघडले

179 धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या चैन्नईची सुरवात अडखळत झाली. आयुष म्हात्रे आणि डेव्हिन काॅनव्हे हे दोघे शुन्यावर बाद झाले

ईडन गार्डन :  कोलकता विरुद्ध चैन्नईच्या सामन्यात कोलकताने दिलेले 179 धावांचे टार्गेट चैन्नईने दोन विकेटस राखून पार केले. या विजयाने कोलकताचे प्लेऑफमध्ये जाण्याचे गणित बिघडले आहे. कोलकत्ताचा ओपनर गुरबाज हा अनशुल कंबोजच्या गोलंदाजीवर नूर अहमदकडे कॅच देऊन आऊट झाला. त्याने अवघ्या 11 धावा केल्या. आक्रमक सुरुवात करणारा सुनील नारायण हा देखील फारकाळ टिकला नाही. 26 असताना नूर अहमदने त्याला विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीकडे झेलबाद केले. अंगकृश रघुवंशी हा देखील एक धाव काढून बाद झाला.

कोलकत्ताच्या एका बाजुने फलंदाज बाद होत असताना अजिंक्य राहणे याने 33 चेंडूत 48 धावांची संयमी खेळी केली. त्यामध्ये त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. मनिष पांडे याने देखील 28 चेंडूत 36 धावा करत कोलकताला 179 धावांपर्यंत मजल मारून दिली.

Chennai Super Kings Defeat KKR

नूर अहमद चमकला

नूर अहमद याच्या गोलंदाजी पुढे कोलकताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्याने त्याने नारायण, रघुवंशी, रसेल आणि रिंकू यादव या धोकादायक फलंदाजांना बाद करून कोलकताच्या फलंदाजांना वेसन घातली. रवींद्र जडेजा याने एक विकेट आणि कंबोजने एक विकेट घेत कोलकताला 179 धावांवर रोखले.

चेन्नईची अडळखत सुरूवात

179 धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या चैन्नईची सुरवात अडखळत झाली. आयुष म्हात्रे आणि डेव्हिन काॅनव्हे हे दोघे शुन्यावर बाद झाले, त्यानंतर उर्वील पटेल हा 31 धावाकडून बाद झाला. त्यामुळे चैन्नईची अवस्था तीन बाद 37 अशी झाली. रवींद्र अश्वीद आणि रवींद्र जडेचा बाद झाल्याने चैन्नईची अवस्था पाच बाद 65 झाली.

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News