गर्मीपासून हैराण झालेल्या मुंबईकरांना अचानक गारव्याचा फिल, हवामान खात्याने काय म्हटलंय?

ढगाळ वातावरण राहील, असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तसेच अधूनमधून हलकासा पाऊस पडेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकर पावसाचा फील येताना दिसताहेत.

Weather Update : मान्सून दाखल होण्यात राज्यात अजून एक महिन्याचा अवधी असताना गेल्या दोन दिवसापासून मुंबईसह उपनगर आणि राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे गर्मीपासून आणि उकाड्यापासून हैराण असणाऱ्या मुंबईकरांना मागील दोन दिवसांपासून मुंबईकर गारव्याचा अनुभव घेताहेत. मागील मंगळवारी रात्रीपासून अचानक वादळ आणि सुसाट्याचा वारा तसेच हलकासा पाऊस यामुळे मुंबईसह उपनगरात पावसाळ्यासारखे वातावरण झाले आहे. त्यामुळे गर्मीपासून मुंबईकरांना थोडीफार सुटका मिळून गारवा आणि थंड वातावरणाचा मुंबईकर अनुभव घेत आहेत.

काही दिवस ढगाळ वातावरण…

दरम्यान, पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विदर्भ, मराठवाडा, या भागात पावसाने हजेरी लावली होती. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यानंतर मुंबईसह उपनगर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच वसई-विरार आणि मुंबईत या आठवड्यात वातावरणात गारवा आणि ढगाळ वातावरण राहील, असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तसेच अधूनमधून हलकासा पाऊस पडेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकर पावसाचा फील येताना दिसताहेत.

राज्यात मान्सून कधी?

सध्या मे महिना सुरू आहे आणि मान्सून हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दाखल होतो. परंतु महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात तापमानाचा पारा वाढला आहे. सर्वत्र उकाडा, गर्मी आणि अंगाची लाहीलाही होत आहे. कधी एकदा पाऊस पडतोय आणि गारवा मिळतोय असे सर्वांनाच वाटत असताना, मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. तर दरवर्षी मान्सून हा 10 ते 15 जूननंतर महाराष्ट्रात दाखल होतो. परंतु यावर्षी मान्सून केरळात दाखल होईल, त्यानंतर 15 जूननंतर महाराष्ट्र दाखल होईल. असं हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News