मुंबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आज कसोटीमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. आपण या पुढे कसोटी क्रिकेट खेळत नसल्याचे त्याने सांगितेल. कसोटीतून निवृत्त होत असलेला रोहित वनडेमध्ये मात्र भारताचे प्रतिनित्व करत खेळणार आहे. त्याने यापूर्वी टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी20 प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती.
भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार होता. त्यामुळे तो तेथे भारतीय संघाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्याने आज निवृत्त जाहीर करत इंग्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघासोबत नसेल हे स्पष्ट केले आहे. रोहित शर्मा त्याची शेवटी कसोटी ऑस्ट्रोलियामध्ये खेळला होता.

कसोटीमध्ये किती धावा
रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये उशीरा संधी मिळाली. तो 67 कसोटी खेळला आहे. त्यामध्ये त्याने 40.58 च्या सरासरीने 4302 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 12 शतक, 18 अर्धशतक आणि एकवेळा 200 धावा केल्या आहेत. 24 कसोटी सामन्यामध्ये त्याने कर्णधारपद भूषवले आहे. त्यामध्ये त्याने 12 विजय मिळवले आहेत. तर, 9 सामन्यांमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे.
वनडे वर्ल्डकप खेळणार
वनडे वर्ल्डकप 2027 मध्ये दक्षिण अफ्रिकेत खेळला जाणार आहे. तोपर्यंत रोहित शर्मा भारतीय संघाचे वनडेमध्ये नेतृत्व करण्याची शक्यता आहे. 2023 च्या वर्ल्डकपमध्ये त्याला फायनलमध्ये ऑस्ट्रोलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, पूर्ण वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली होती. रोहित हा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. वर्ल्डकप 2027 झाल्यानंतर तो निवृत्त वनडेमधून देखील निवृत्त होण्याची शक्यता आहे.