मोहिनी एकादशी कधी आहे? मोहिनी एकादशीला व्रत पूजा विधी कसा करावा जाणून घेऊया….

मोहिनी एकादशीचे खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचे स्मरण करून त्याचे व्रत केले जाते. या व्रताने पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो, असे मानले जाते.

हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. आज म्हणजेच मे महिन्याच्या 8 तारखेला मोहिनी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णु आणि त्यांच्या मोहिनी अवतारची पूजा केली जाते. मोहिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने सुख, समृद्धी आणि पापमुक्त जीवन प्राप्त होते, असे मानले जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला “मोहिनी एकादशी” असे म्हणतात. मोहिनी एकादशी कधी आहे? मोहिनी एकादशीला व्रत पूजा विधी कसा करावा जाणून घेऊया….

मोहिनी एकादशीचे महत्त्व

पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनानंतर देवांना अमृत प्राप्त करण्यासाठी, भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते. समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या अमृताचे रक्षण करण्यासाठी नारायणाने हे रूप धारण केले होते. या रूपाने असुर मोहित झाले आणि देवांना अमृत प्राप्त करण्यास मदत केली. त्यामुळे, या एकादशीला ‘मोहिनी एकादशी’ असे म्हणतात. मोहिनी एकादशीचे खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचे स्मरण करून त्याचे व्रत केले जाते. या व्रताने पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो, असे मानले जाते. तसेच, या दिवशी दान-धर्माचे कार्य केल्याने मोठे पुण्य मिळते.

पूजेची शुभ वेळ 

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 मे रोजी सकाळी 10:11 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मे रोजी दुपारी 12:29 वाजता संपेल. उदयतिथीनुसार, मोहिनी एकादशी फक्त 8 मे रोजी साजरी केली जाईल. पूजेची शुभ वेळ सकाळी 6:06 ते 8:42 पर्यंत असेल.  9 मे रोजी सकाळी 6:06 ते 8:42 या वेळेत वैशाख शुद्ध एकादशी ची सांगता होणार आहे. या दिवशी दान केल्यामुळे तुम्हाला मोक्ष आणि पुण्य प्राप्ती होते.

पूजा विधि

मोहिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे. भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि त्यांना पिवळे कपडे अर्पण करा. चंदन, तांदूळ, फुले, तुळशीची पाने, धूप आणि दिवा लावून भगवान विष्णूची पूजा करा. मोहिनी एकादशीची व्रतकथा ऐका. भगवान विष्णुचे नामस्मरण आणि ध्यान करा. दिवसभर उपवास करा (तुम्ही फळे खाऊ शकता) भगवान विष्णूंचे मंत्र जप करा. भगवान विष्णूंचे स्तोत्र म्हणा. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला ब्राह्मणांना जेवण द्या, नंतर उपवास सोडा. मोहिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. या दिवशी उपवास करणे, भगवान विष्णूची पूजा करणे, कथा श्रवण करणे आणि दान-धर्म करणे हे महत्त्वाचे आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News