India Pakistan War – गुरुवारी रात्री भारताने पाकिस्तानमधील ११ शहरांवर हल्ला केला आहे. भारताच्या S-400 यंत्रणाने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सर्व प्रयत्न हाणून पाडले. भारताने पाकचे हल्ले उधळून लावले. यानंतर पाकिस्तानचे चारी बाजूनी कोंडी होताना दिसत आहे. तसेच पाकिस्तान पुरता भांबावून गेला आहे. एवढे होऊनही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.
भारताला नष्ट करु…
दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील ११ शहरांवर हल्ला केला आहे. गुरुवारी रात्रभर भारताने पाकिस्तामधील विविध ठिकाणी हल्ले केले आहेत. जोरदार तडाखा केला आहे. पण एवढे होऊनही सकाळी पाकिस्तानने पठाणकोट येथे हवाई हल्ले केलेत. पण भारताने पाकचे हल्ले उधळून लावले. भारताने रात्रभर पाकला अक्षरक्ष: भाजून काढले आहे. पाकचे मोठे नुकसान होऊनही आमचे काही नुकसान झाले नाही. सकाळापासून आम्ही इस्लामाबद येथे सर्व काही सुरळीत सुरु आहे. आम्ही येथे चहा पीत आहोत. पण युद्धाची अजिबात येथे झळ नाही. मात्र आम्ही सुद्धा भारताला चोख उत्तर देऊ आणि भारताला उद्धवस्त करु, असा कांगावा पाकच्या नागरिकांनी केला आहे.

दोन्हीकडून नुकसान, युद्ध नको…
दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमधील तसेच दोन्ही देशांच्या सीमा भागातील रात्रभर सुरु असलेल्या युद्धावरुन प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. रात्रभर गोळ्यांचा आवाज सुरु आहे. तोफा, गोळा. सायरण यांचा आवाज आमच्या कानावर पडतोय. दोन्हीकडून गोळीबार सुरु आहे. दोघांनाही आपण किती मोठे आहोत, हे दाखवायचे आहे. पण दोघांच्या या लढाईत सामान्य माणूस याचे नुकसान होतेय, सामान्य माणसं भरडली जातात. आम्हाला जंग नको आहे. अशी प्रतिक्रिया सीमावर्ती भागातील लोकांनी दिली आहे.