Devendra Fadnvis – मंगळवारी रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सिंदूर ऑपरेशन केले. यात पीओकेमधील ९ अतिरेक्यांची तळं उध्वस्त करण्यात आली असून, 26 अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे. या सिंदूर ऑपरेशननंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. हल्ल्याचे उत्तर युद्ध हा पर्याच होत नाही, ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला आहे, त्यांना शोधून मारले पाहिजे. त्यासाठी कोंम्बिग ऑपरेशन केले पाहिजे. याचा अर्थ युद्ध करणे असा होत नाही. असं हल्ल्यावर राज ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सौदी अरबियाचा अर्धवट दौरा सोडून आले होते. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये जाऊन कँम्पिनिंग केले. केरळला गेले. मुंबईत वेवज परिषदेला आले. मग तेव्हाच पाऊल काय उचलले गेले नाही. अतिरेक्यांना मारण्यासाठी तुम्ही कोणते पाऊल उचलताय हे सांगा असं राज ठाकरेंनी म्हणत हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टिका केली आहे.

त्यांना फारसं महत्त्व नाही…
दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, राज ठाकरे काय बोलले, याला मी फारसं महत्त्व देत नाही. भारताने जे आतंकवादी अड्डे नष्ट केलेत, त्या कारवाईच्या पाठीमागे संपूर्ण भारत देश उभा आहे. सर्व भारतीयांनी याचं स्वागत केलं आहे. आणि संपूर्ण जग भारताच्या कारवाईबद्दल भारताचे कौतूक करत आहे. त्यामुळे ते काय बोलले याकडे आम्ही लक्ष देत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना लगावला. भारताने पाकिस्तानमध्ये घूसुन अतिरेक्यांचे अड्डे नष्ट केलेले आहेत. पीओकेमध्ये घुसून दहशतदवाद्यांचे 26 अड्डे नष्ट केलेत. त्यामुळे लष्करी दल, पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे मी अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
आपल्या देशात कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या अतिरेक्यांना शोधून काढणे महत्त्वाचं आहे. युद्ध हा त्याचा पर्याय नाही. युद्ध हे उत्तर नाही. तेव्हा अमेरिकेने युद्ध केलं नाही. दुसरीकडे जेव्हा अमेरिकेच्या व्हॉईट हाऊसवर हल्ला केला होता. तेव्हा अमेरिकेने युद्ध पुकारले नव्हते. तर ज्या अतिरेक्यांना शोधून मारले होते, हे एक उदाहरण आहे. त्यामुळे भारतानेही कुठेतरी अंतर्मुख झाले पाहिजे. आणि या हल्याचे उत्तर देणे म्हणजे युद्ध असा होत नाही. पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे. त्याला काय बरबाद करणार तुम्ही? ज्यांनी हल्ला केला ते अतिरेकी तुम्हाला अजून सापडले नाहीत. जिथे हजारो पर्यटक जातात. इतके वर्ष जातात. तिथे सिक्युरिटी का नव्हती? हे पाहिले पाहिजे, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.